वर्ध्यातून निघणार बिहारसाठी विशेष प्रवासी रेल्वे; पाच थांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 14:44 IST2020-05-06T14:42:56+5:302020-05-06T14:44:55+5:30

बिहार राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या आणि लॉकडाऊनमुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या १ हजार १९ मजुरांच्या घरवापसीसाठी वर्धा जंगशन येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे.

Special passenger train for Bihar to depart from Wardha; Five stops | वर्ध्यातून निघणार बिहारसाठी विशेष प्रवासी रेल्वे; पाच थांबे

वर्ध्यातून निघणार बिहारसाठी विशेष प्रवासी रेल्वे; पाच थांबे

ठळक मुद्दे१०१९ मजूर गाठणार बरोनी२४ बोगी घेऊन धावणार इंजिन



लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: बिहार राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या आणि लॉकडाऊनमुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या १ हजार १९ मजुरांच्या घरवापसीसाठी वर्धा जंगशन येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे. वर्धेवरून सुटणारी ही विशेष रेल्वे गाडी नागपूर, इटारसी, जबलपूर, डीडीव्ही या चार ठिकाणी काही मिनिटांचा थांबा घेऊन बिहार राज्यातील बरोनी गाठणार आहे. एकूण २४ डब्याच्या या रेल्वे गाडीत सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करून मजुरांना बसविण्यात आले. प्रत्येक मजूरांना पिण्याचे पाणी आणि जेवनाचा डबा वैद्यकीय जनजागृती मंच या सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आला. वर्धेवरून सुटणारीही विशेष रेल्वे गाडी गुरूवारी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास बिहार राज्यातील बरोनी येथे पोहोचणार आहे. पालकमंत्री सुनील केदार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर ही विशेष रेल्वे गाडी वर्धेवरून पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहे.

Web Title: Special passenger train for Bihar to depart from Wardha; Five stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.