सभापती युवराज ढोले तर उपसभापती विनायक धोंगडी

By Admin | Updated: September 2, 2015 03:41 IST2015-09-02T03:41:00+5:302015-09-02T03:41:00+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आघाडीचा एकहाती झेंडा फडकला. यात मंगळवारी झालेल्या

Speaker Yuvraj Dhole, while Deputy Speaker Vinayak Dhongadi | सभापती युवराज ढोले तर उपसभापती विनायक धोंगडी

सभापती युवराज ढोले तर उपसभापती विनायक धोंगडी

आष्टी (शहीद) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आघाडीचा एकहाती झेंडा फडकला. यात मंगळवारी झालेल्या सभापती उपसभापतिपदाच्या निवडणुकीत युवराज ढोले यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी विनायक धोंगडी यांची वर्णी लागली आहे.
संचालकांच्या निवडणुकीत एकूण १८ पैकी १५ संचालक भाजपा तर काँग्रेसच्या वाट्याला तीन सदस्य आले होते. काँग्रेसच्या आपसी कलाहाचा फटका बसल्याने येथे सत्ता गमवावी लागली. येथे माजी आमदार दादाराव केचे व श्रीधर ठाकरे यांनी विजय मिळविला. भाजपाचे १५ संचालक निवडून आल्याने बाजार समितीवर सत्ता काबीज केली. संपूर्ण राज्यात भाजपाची पहिली बाजार समिती असल्याचे केचे यांनी सांगितले. सभापती युवराज ढोले, उपसभापती विनायक धोंगडी यांचा विजय होताच भाजपच्या संचालकांनी एकच जल्लोष केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी. वनस्कर यांनी काम पाहिले. नवनियुक्त सभापती व उपसभापतींनी बाजार समितीच्या विकासाकरिता प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला.(प्रतिनिधी)

Web Title: Speaker Yuvraj Dhole, while Deputy Speaker Vinayak Dhongadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.