सोयाबीनपासूनचे दूध गुणकारी
By Admin | Updated: December 3, 2014 22:55 IST2014-12-03T22:55:40+5:302014-12-03T22:55:40+5:30
सोयाबीन या पिकास गोल्डन क्रॉप-न्युट्रेशन गोल्ड समजून त्यापासून दुध, ताक, दही, लस्सी, श्रीखंड इ. पदार्थ तयार करता येत असल्याची माहिती दिली. कॅन्सर आजारावर सोयाबीन उपयुक्त आहे.

सोयाबीनपासूनचे दूध गुणकारी
वर्धा : सोयाबीन या पिकास गोल्डन क्रॉप-न्युट्रेशन गोल्ड समजून त्यापासून दुध, ताक, दही, लस्सी, श्रीखंड इ. पदार्थ तयार करता येत असल्याची माहिती दिली. कॅन्सर आजारावर सोयाबीन उपयुक्त आहे. सोयाबीन पासून तयार केलेले दुध हे मधुमेह, कॅन्सर करिता याकरिता गुणकारी आहे, असे मार्गदर्शन प्रकल्प संचालिका पूजा मोहरकर यांनी केले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१४-१५ अंतर्गत कडधान्य पिकाचे शेतकरी प्रशिक्षण शिबिर स्थानिक बच्छराज धर्मशाला येथे उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याद्वारे घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. उल्हास नाडे यांनी बियाणे, पेरणीप्रक्रिया, पेरणीपूर्व जमीन मशागत, कीड नियंत्रण-निंबोळी अर्क, जैविक औषधी भाजीपाला पिकावर फवारणे करणे याबाबत मार्गदर्शन केलेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यालयाचे सल्लागार नरेंद्र काळे यांनी शेतकरी संघटन, सेंद्रिय कर्ब, जमिनीची सुपिकता, हरित क्रांती, आदींबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करीत म. फुले ज. भूमीअभियान, जमिनीत पाणी मुरविणे, आदर्श गाव याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. कंकाळ यांनी माती तपासणीचे महत्व, उत्पादन वाढविणे, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पीक उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने फवारणी, जमिनीची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने जमिनीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्य पिकाला पोषक असतात. मात्र सध्या ते जमिनीतून योग्यप्राकारे पिकांना मिळत नाही. जमिनीतील उपलब्ध अन्न द्रव्ये विरघळणे पिकांसाठी आवश्यक आहे. आणि त्याकरिता जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. ओलावा नसल्यास ते पिकास मिळत नाही. याकरिता बीबीएफ वर पीक पेरणी, उतारास आडवी व गरजेनुसार दोन टक्के युरिया खताची पिकावर फवारणी करणे, पोटॅश पुरक खते याकरिता सुक्ष्म मुलद्रव्ये देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आवश्यक असलेली खते, एन.पी.के, कॅलशियम मॅग्नेशियम सल्फर, कॉपर, झिंक, जस्त, बोरान इ. मुलद्रव्ये पिकास न मिळाल्याने पिकाची वाढ खुंटून उत्पादनात घट कशी येते याबाबत मार्र्गदर्शन केले. सकस आहाराबाबत निर्देशांक, भारतीय मानके याविषयी माहिती दिली. ज्याप्रकारे आपण शरिराच्या विविध प्रकारच्या तपासण्या करतो तश्याच प्रकारे माती परिक्षण, प्राथमिक परिक्षण, तसेच विशेष परिक्षण करणे अत्यावश्यक आहे. मातीतील उपलब्ध अन्नद्रव्य कोणती आहेत व कोणती नाही हे विश्लेषण अहवालावरून दिसून येते. तो अहवाल क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना समजवून सांगणे गरजेचे आहे. जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य याचा विचार करून खते देण्याविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
मंदार नवरे, डॉ. नेमाडे यांनी कीड व रोग व्यवस्थापन, सरळ वाण, नुकसान पातळी किडीने ओंलाडली तिथे पक्षी थांबे, निंबोळी अर्क, पोटॅशियम नायट्रेड याची फवारणी करण्यात यावी तसेच हरभरा बियाणे बीज प्रक्रीया करूनच पेरणी करावी असेही ते म्हणाले.
संचालन प्रदीप पांडे यांनी केले. आभार बिपिन राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी किशोर जगनकर, आनंद मून, ईश्वर कांबळे, शेंद्रे, अविनाश भागवत, राजू माहुरे, गेडाम यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)