सोयाबीन करपले; पिवळे पडत चालले पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:31+5:30
ऑगस्टमध्ये नागपंचमीनंतर संततधार सुरू आहे. यामुळे रविराजाचे दर्शनच नाही. याचाच परिणाम, तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पीक पिवळे पडून करपत आहे. तालुक्यातील खुबगाव, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर आदी भागातील शिवारातील शेतात जोमात बहरलेले सोयाबीन पीक अज्ञात रोगाने केलेल्या आक्रमणामुळे अचानक पिवळे पडायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.

सोयाबीन करपले; पिवळे पडत चालले पीक
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : तालुक्यात मागील आठ दहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीन पिवळे पडून करपायला लागले आहे. त्यामुळे पीक हातचे जाते की काय, या चिंतेत तालुक्यातील शेतकरी दिसून येत आहेत.
यावेळी जुलै महिन्यात फारसे पर्जन्यमान झाले नाही. ऑगस्टमध्ये नागपंचमीनंतर संततधार सुरू आहे. यामुळे रविराजाचे दर्शनच नाही. याचाच परिणाम, तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पीक पिवळे पडून करपत आहे. तालुक्यातील खुबगाव, नांदपूर, देऊरवाडा, जळगाव, शिरपूर आदी भागातील शिवारातील शेतात जोमात बहरलेले सोयाबीन पीक अज्ञात रोगाने केलेल्या आक्रमणामुळे अचानक पिवळे पडायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. सोयाबीनचा फुलोरा बहरला असता अचानक करपत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन कपाशीवर रोगाचा प्रभाव पाहता कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
शेतात सोयाबीन फुलांनी बहरले होते. पीक शेंगांवर आले असतानाच अचानक तीन-चार पिवळे पडून करपायला लागले आहे. कृषी विभागाने पाहणी करून प्रभावी उपाययोजना सुचविणे गरजेचे आहे.
- राजेश अंबाळकर, शेतकरी, खुबगाव.