३ हजार ५०० गारपीटग्रस्तांची वीज देयके माफ
By Admin | Updated: May 20, 2014 23:50 IST2014-05-20T23:50:04+5:302014-05-20T23:50:04+5:30
राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले़ या नुकसानीकरिता आपादग्रस्त शेतकर्यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात

३ हजार ५०० गारपीटग्रस्तांची वीज देयके माफ
रूपेश मस्के - कारंजा (घा़)
राज्यात माहे फेब्रुवारी व मार्च २०१४ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले़ या नुकसानीकरिता आपादग्रस्त शेतकर्यांना विशेष पॅकेजद्वारे वीज बिलात सुट देण्यात येणार आहे़ याचा लाभ तालुक्यातील ३ हजार ५०० गारपीटग्रस्त शेतकर्यांना मिळणार आहे़ त्यांची जानेवारी ते जून २०१४ ची वीज देयके महावितरणला राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येणार आहे़ राज्यात फेब्रुवारी-मार्च २०१४ या कालावधीत गारपीट व अवकाळी पाऊस झाला़ यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली़ या गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ यात बाधित झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विशेष पॅकेज देण्यात येणार आहे़ कारंजा तालुक्यातील गहु ७४२ हेक्टर, चना ७१७ हेक्टर, संत्रा, मोसंबी २३३ हेक्टर, व इतर ७० हेक्टर असे एकूण १ हजार ७६५ हेक्टरचे ३ हजार ५०० शेतकरी नुकसानग्रस्त आहेत़ त्यांच्या याद्या विद्युत वितरण विभागाने कृषी अधिकारी कारंजा यांना मागितल्या असून ज्या शेतकर्यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीत आहे, अशांना या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकार्यांनी संबंधित जिल्हाधिकार्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांशी संपर्क साधून बाधित शेतकर्यांची अधिकृत माहिती घेऊन अमंलबजावणी करण्याचे आदेशित केले आहे. यानुसार कृषी पंपधारक गारपीटीने बाधित यादीत नाव असलेल्या शेतकर्यांचे वीज देयके माफ होणार आहे. शेतकर्यांच्या बाधित यादीतील नाव, वीज क्रमांक, जानेवारी ते मार्च वीज बिलाची रक्कम व एप्रिल ते जून बिलाची रक्कम अशी माहिती पुरवायची आहे. नापिकी व कर्जबाजारी, अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकर्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.