शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; मुलगा जागीच गतप्राण, आई गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:23 IST

नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली.

ठळक मुद्देनागपूर-हैदराबाद मार्गावरील भीषण अपघात

वर्धा : हिंगणघाट शहरातील नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार मुलगा जागीच गतप्राण झाला तर त्याची आई गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला.

गजानन पुसदेकर (४०) असे मृतकाचे तर गंगा पुसदेकर (६०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या उकरडा येथील रहिवासी आहेत.

दुचाकीवरील माय-लेक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, चंद्रपूर येथील चड्डा ट्रान्स्फर कंपनीच्या (एम. एच. ३४ बी. झेड. ०१९३) ट्रकने महाकाली नगरी समोर दुचाकीला (एम. एच. ३४ बी. इ. १०३८) जबर धडक दिली. यात गजानन याला ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गंगा या गंभीर जखमी झाल्या.

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गंभीर जखमी गंगा यांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे, चांगदेव भुरंगे, प्रवीण चौधरी, संपत वलतकर, नितीन राजपूत, अझहर खान, प्रदीप राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक