महार्गावरील गावांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:13+5:30

या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले व समस्या मांडल्या.

Solve problems on highway villages | महार्गावरील गावांच्या समस्या सोडवा

महार्गावरील गावांच्या समस्या सोडवा

ठळक मुद्देबुटीबोरी-तुळजापूर मार्ग : अधिकाऱ्यांशी आमदारांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाच्या वर्धा विधानसभा मतदारसंघाशी संबंधित समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी नरेश वडेटवार यांच्याशी नागपूर येथे आमदार डॉ. पंकज भोयर यांची १२ डिसेंबरला बैठक झाली. या बैठकीत या महामार्गाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्याची मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याची हमी प्रादेशिक अधिकारी नरेश वडेटवार यांनी दिली.
या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले व समस्या मांडल्या.
अपघात टाळण्याकरिता व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वर्ध्यावरून आणि नागपूरवरून सेलू शहरात प्रवेश करताना, पिपरी (मेघे) परिसरात, जुनापाणी चौकातील पोचरस्त्यांचे काम तातडीने करण्यात यावे, जुनापाणी चौकातील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्यात यावे, उमरी (मेघे) परिसरात महामार्गावरील सात ठिकाणी पोचरस्ता जोडणीचे काम झालेले नाही. हे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी आमदार भोयर यांनी केली. सावंगी (मेघे) परिसरात रेल्वे उड्डाणपुलामुळे विभागल्या गेलेल्या वस्तीत दोन्ही बाजूंना आवागमन करण्याकरिता पुलाखालून रस्त्याची सोय करण्यात आलेली नाही. ती करण्यात यावी तसेच पवनार परिसरात बसस्थानक चौकात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नाली बांधकाम व दुभाजकावर विद्युत दिवे लावण्याचे काम तसेच बसस्थानक चौकात गतिरोधक लावण्याचे काम करायचे आहे. यासोबत अंडरपास किंवा पाथवे बनवायचा आहे. या सर्व कामांना प्राधान्य देण्यात यावे, सालोड परिसरात महामार्गाला जोडणारा पोचरस्ता व प्रवासी निवाºयाचे काम, सिंदी (मेघे) परिसरातील सर्व पोचरस्ते तयार करण्याचे काम करावयाचे आहे. ही कामेही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक उत्तमसिंग, सेलूचे माजी नगराध्यक्ष राजेश जयस्वाल, माजी जि. प. सदस्य सुनीता ढवळे, आशीष कुचेवार, सचिन खोसे, अजय गोंडाळे, शब्बीरअली सय्यद, शकुंतला नगराळे यांची उपस्थिती होती.

Web Title: Solve problems on highway villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.