तक्रारी प्राधान्याने सोडवा
By Admin | Updated: July 9, 2014 23:48 IST2014-07-09T23:48:54+5:302014-07-09T23:48:54+5:30
लोकशाळी दिनात दाखल होणाऱ्या जनतेच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेवून त्यावर तातडीने निर्णय घ्या. अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिल्यात. जिल्हा लोकशाही दिनात

तक्रारी प्राधान्याने सोडवा
एन. नवीन सोना : लोकशाही दिनात ३६ तक्रारी दाखल
वर्धा : लोकशाळी दिनात दाखल होणाऱ्या जनतेच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेवून त्यावर तातडीने निर्णय घ्या. अशा सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिल्यात. जिल्हा लोकशाही दिनात जनतेची गाऱ्हाणी ऐकल्यानंतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३६ तक्रारदारांनी आपल्या प्रश्नासंदर्भात निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गाढे, उपविभागीय अधिकारी नावाडकर, हरिष धार्मिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हास्तरावर तक्रार दाखल करण्यापूर्वी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात आपली तक्रार सादर करावी अशा सूचना करताना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना म्हणाले, आपले प्रश्न सोडविताना तालुकास्तरावर गाऱ्हाणी सोडविल्यास वेळेची व पैशाचीही बचत होईल. तालुकास्तरावर प्रश्न न सुटल्यास जिल्हास्तरावर लोकशाही दिनात आपली तक्रार दाखल करावी. या तक्रारीवर एक महिन्याच्या आत संबंधीत विभागांनी निर्णय घ्यावा. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. या लोकशाही दिनात ३६ तकारी ग्रामस्थांनी दाखल केल्या.(शहर प्रतिनिधी)