एनआरएचएम आणि आरकेएसमधून लिपिकांना वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:43 IST2017-09-08T00:43:03+5:302017-09-08T00:43:24+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लिपीक वर्गीय कर्मचाºयांना एनआरएचएम व आरकेएसची कामे देण्यात येत आहे.

एनआरएचएम आणि आरकेएसमधून लिपिकांना वगळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लिपीक वर्गीय कर्मचाºयांना एनआरएचएम व आरकेएसची कामे देण्यात येत आहे. या कामातून अनेक प्रकारचे घोळ निर्माण झाले असून त्याला सर्वस्वी जबाबदार लिपीक वर्गीय कर्मचाºयांना धरल्या जात आहे. यामुळे त्यांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना करण्यात आली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेतून आरोग्य अधिकाºयांनी लिपीकांना आरकेएसच्या कामातून वगळण्यात येईल या आशयाचे पत्र काढण्याचे आश्वासन दिले. मात्र कर्मचाºयांना एनआरएचएमची कामे करावी लागतील असे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेचा दाखलाही देण्यात आला. या चर्चेमध्ये झालेल्या निर्णयानुसारच सदर परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाºयांनी कळविले. या चर्चेला संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत भोयर, महिला उपाध्यक्ष निलीमा उगेमुगे, सचिव बाळा घारड यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
औषध खरेदीच्या कामात गोंधळाचा आरोप
काही प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वैद्यकीय अधिकाºयांकडून आवश्यकतेनुसार औषधी खरेदी होते. त्याची देयके या लिपीकाकडे देण्यात येतात. यात कधी औषधसाठा खरेदी न होताही देयक सादर करून लिपीकाला ती खतविण्याकरिता धमकावणी होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याला आळा घालण्याची मागणीही त्यांच्याकडून जिल्हा आरोग्य अधिकाºयांना करण्यात आली. यावर डिएचओ डॉ. डवले यांनी असा प्रकार घडल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा असा सल्ला दिला.