शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी उपविभागात दोन वर्षात सोळा हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

चोरी, मंगळसुत्र चोरी आदी घटनाही घडल्या असून निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याचेच दिसून आले आहे. आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस ठाण्याचा परिसर येतो. या परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन व पोलीस चौकीची निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देगुन्ह्याचा आलेख वाढताच : १६ जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : उपविभागीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हाचा आलेख दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मागील दोन वर्षातील गुन्ह्याचा मागोवा घेतला असता १६ हत्या करण्यात आल्या तर १६ लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यासोबत जबरी चोरी, मंगळसुत्र चोरी आदी घटनाही घडल्या असून निम्म्यापेक्षा जास्त प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याचेच दिसून आले आहे.आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस ठाण्याचा परिसर येतो. या परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन व पोलीस चौकीची निर्मिती केली आहे. यातील बहूतांश पोलीस चौक्यातून गुन्ह्यावर आळा घालण्याऐवजी दारुविक्रेला प्रोत्साहन देण्याचेच काम चालत असल्याची ओरड होत आहे.यासर्व पोलीस ठाण्यातच्या हद्दीत मागील दोन वर्षांमध्ये ११५ चोरीच्या घटना घडल्या असताना केवळ ४१ चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. यासोबतच ४३ वाहने चोरीला गेले असून १८ वाहनेच पोलिसांच्या हाती लागले आहे. थकबाकीचे २० प्रकरण असून त्यापैकी ११ प्रकरणच उघडकीस आले आहे. या उपविभागात दंग्याचा १५ घटना घडल्या असून २२ ठिकाणी शासकीय कर्मचाºयावर हल्ले करण्यात आल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यासोबतच मुलींना पळवून नेणे, महिला व मुलींवरील अत्याचार, शारिरीक शोषण, अपघात अशा अनेक घटना घडल्या असून त्यांचीही नोद करुन पोलिसांनी तपास चालविला आहे.आर्वी उपविभागाअंतर्गत येणाºयाआर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव व खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत ९०१ प्रकरण कायम करण्यात आले असून ७४० प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांनी दिली आहे. आर्वी उपविभागात आर्वी पोलीस स्टेशनमध्ये संपत चव्हाण, आष्टीत ठाणेदार जितेंद्र चांडे, कारंजा ठाणेदार राजेंद्र शेट्ये, तळेगाव पोलीस स्टेशनचे रवींद्र राठोड व खरांगणा पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार संजय गायकवाड कार्यरत आहेत.

टॅग्स :Murderखून