Corona Virus in Wardha; वर्ध्यात सहा व्यक्ती आयसोलेशनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 17:18 IST2020-03-27T17:18:30+5:302020-03-27T17:18:59+5:30
वर्धा जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. होम क्वारंटाईन दरम्यान प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत सहा व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Corona Virus in Wardha; वर्ध्यात सहा व्यक्ती आयसोलेशनमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
वधार् : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिल्या वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी विदेशातून तसेच कोरानाबाधित जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. होम क्वारंटाईन दरम्यान प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत सहा व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यात थायलॅन्ड आणि मुंबई येथून आलेल्या दाम्पत्याचा समावेश आहे.
जिल्ह्याबाहेरून तसेच कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या ४ हजार ४० व्यक्तींना जिल्हा प्रशासनासह कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेने विशेष मोहिमेच्या तिसºया दिवशी म्हणजे शुक्रवारपर्यंत हुडकून काढले आहे. तर सध्या स्थितीत ३४ व्यक्ती होम क्वारंटाईमध्ये आहेत. होम क्वारंटाईनदरम्यान प्रकृती बिघडल्याने थायलॅन्ड येथून आलेल्या एका दाम्पत्याला तसेच मुंबई येथून आलेल्या एका दाम्पत्याला आणि चन्नई येथून आलेल्या एका मुलीसह पुणे येथून आलेल्या मुलाला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवाय त्यांच्यावर औषधोपचार केला जात आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते की प्रकृती खालावतेय याकडे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष देऊन आहेत.