शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

आॅटो-कंटेनरच्या भीषण अपघातात सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:37 IST

येथील राष्ट्रीय महामार्ग सात वर येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ भरधाव कंटेनरने आॅटोला धडक दिली. यात आॅटोतील सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला.

ठळक मुद्देचार गंभीर : राष्ट्रीय महामार्ग सात वरील वर्धा नदीच्या पुलाजवळ येरला येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट (वर्धा) : येथील राष्ट्रीय महामार्ग सात वर येरला शिवारात वर्धा नदीच्या पुलाजवळ भरधाव कंटेनरने आॅटोला धडक दिली. यात आॅटोतील सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला.पोलीस सुत्रानुसार, एन. एल. ०१ ए.बी. ८०२१ क्रमांकाचा कंटेनर पांढरकवड्याच्या दिशेने जात होता. हा कंटेनर येरला फाटा नजीकच्या वर्धा नदीच्या पुलाजवळ आला असता त्याने एम.एच. २९ व्ही. ९११३ क्रमांकाच्या आॅटोला जबर धडक दिली. यात नितीन कंगाले (३०) रा. सोनेगाव (रा.), यमुना कंगाले (५५), हरिभाऊ ठमके (५८) रा. येरला, ज्ञानेश्वर रामाजी कुंभरे (५५) रा. सोनेगाव (रा.), श्रावण बापूराव आलाम (६५) रा. गांगापूर, वच्छला श्रावण आलाम (५५) रा. गांगापूर यांचा मृत्यू झाला. तर बंडु मडावी (५५) फुकटा, वच्छला बंडू मडावी (५०) रा. फुकटा, नानाजी पुरके (५०) रा. मानकापूर, जानराव कंगाले (६०) सोनेगाव हे गंभीर जखमी झाले. जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या मधोमध असल्याने व घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केल्याने या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या सुमारे तास परिश्रम घेत या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग