उन्हाच्या तडाख्याने मजुरांचे हाल

By Admin | Updated: May 1, 2015 01:43 IST2015-05-01T01:43:39+5:302015-05-01T01:43:39+5:30

दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत.

The situation of laborers by the scorching heat | उन्हाच्या तडाख्याने मजुरांचे हाल

उन्हाच्या तडाख्याने मजुरांचे हाल

तळेगाव (श्या.पं.) : दिवसेंदिवस ऊन कडाडत असल्याने आरोग्यविषयक समस्या बळावू लागल्या आहेत. पोटासाठी श्रमाची कामे करण्यास बाध्य असलेल्या मजुरांचे उन्हामुळे हाल होत आहेत. वातावरणात होत असलेला बदल हा आरोग्यासाठी हानिकारक ठरला आहे. यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना मजूर वर्गातून वाढत्या उष्म्यामुळे नकार देण्यात येत असल्याची स्थिती आहे.
कधी ऊन तर कशी पाऊस, आभाळ अशी स्थिती असल्याने वातावरणाचा समतोल बिघडला आहे. एकाएकी उन्हाचा पारा वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. पोटासाठी उन्हातान्हात काम करणे गरजेचे असल्याने मजुरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अधिक पाणी पिणे, पाढऱ्या रंगाचे कपडे घालणे आवश्यक आहे. उन्हात जाताना डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधल्याने उन्हापासून बचाव करू शकतो. उन चांगलेच कडाडल्याने ग्रामस्थ शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत असल्याचे चित्र आहे.
तळेगाव परिसरात अजूनही कपाशी वेचणीसाठी मजूर शेतात जात आहेत. मात्र सकाळी ८ ते दुपारी १ या वेळातच शेतात मजूर काम करताना दिसतात. कडाडलेल्या उन्हामुळे मजुरांना आजार जडत असून परिणामी रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागात रस्ते ओस पडत आहे.(वार्ताहर)

Web Title: The situation of laborers by the scorching heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.