लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाºयांना निवेदनवर्धा - शाहु, फुले, आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणाºया महाराष्ट्रात अशी निंदनिय घटना घडणे हे योग्य नाही. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस वर्धा जिल्ह्याच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेची निपक्षपणे चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राकाँच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, बाबाराव झलके, प्रा. खलील खतीब, जि.प. सदस्य धनराज तेलंग, लक्ष्मीनारायण सोनवणे, संदीप किटे, विनय डहाके, अंबादास वानखेडे, संजय कामनापुरे, डॉ. किशोर अहेर, विकास खोडके, मंगेश गावंडे, विनायक बोंडे, प्रवीण गांधी, अब्दुल गणी, राजेंद्र गहेरवार यांच्यासह राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षवर्धा- कोरेगाव भीमा, जि.पुणे येथील घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. शिवाय या घटनेतील मुख्य सुत्रधारांना तात्काळ जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. राज्यात व देशात सध्या अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत. यात अनेकांचे बळी जातात, असा आरोप जिल्हा सेके्रटरी सीताराम लोहकरे, पक्षाचे राज्य कमिटी सदस्य यशवंत झाडे यांनी केला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही माकपने केली आहे. बुधवारच्या बंदलाही माकपने पाठींबा जाहीर केला होता.सागर (मेघे) विचार मंचवर्धा- कोरेगाव भीमा येथील घटनेचा सागर मेघे विचारमंचातर्फे निषेध करण्यात आला आहे. बुधवारच्या बंदलाही सदर मंचच्यावतीने पाठींबा जाहीर करण्यात आला होता. तशी माहिती सागर मेघे विचार मंचचे अध्यक्ष विलास कांबळे यांनी दिली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना डॉ. प्रशांत वैद्य, वर्षा कांबळे, प्रमोद भावकर, किशोर तेलंग, अज्जू भैय्या आदींची उपस्थिती होती.रिपाइं (गवई गट)वर्धा- कोरेगाव भीमा येथील घटनेचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई) गटातर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले असून यावेळी रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुल पांडे, जिल्हाध्यक्ष अॅड. नरेंद्र पाटील, आशीष पाटील, आशीष मसराम, धनराज बागेश्वर, महेश लोंढे आदी उपस्थित होते.
कोरेगाव भीमा येथील घटनेचे उमटले तीव्र पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:40 IST
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी,
कोरेगाव भीमा येथील घटनेचे उमटले तीव्र पडसाद
ठळक मुद्देविविध संघटनांकडून निवेदन : घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी