शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेची एकच प्रत

By admin | Updated: September 24, 2015 02:34 IST

महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्यावतीने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेला आहे.

इंग्रजी शाळा साशंक : पुणे विभाग म्हणतो, प्रश्नपत्रिकांचा पुरवठा केलेला आहेवर्धा : महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्यावतीने सर्व शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्याचा कार्यक्रम ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित केलेला आहे. यासाठी जिल्ह्यातील शिक्षण विभागाला प्रश्नपत्रिकांचा पुरवठाही करण्यात आल्याचे परिषदेने पत्रात म्हटले आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांना एकच प्रश्नपत्रिका पाठवून त्याची सत्यप्रत काढून ही चाचणी घेण्याच्या मौखिक सूचना स्थानिक शिक्षण विभागाने केल्यामुळे संबंधित शाळा या चाचणीबाबत साशंक आहे.१८ सप्टेंबरच्या महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या पत्रानुसार चाचणी घेण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नोत्तर पत्रिकांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच आणखी काही प्रश्नपत्रिकांची आवश्यकता असल्यास त्याप्रमाणे पोहच करण्याची व्यवस्था तत्काळ करण्यात येईल. यासोबतच सुलभ संदर्भासाठी पायाभूत चाचण्यांच्या प्रश्नोतर पत्रिकांची सॉफ्ट कॉपी ई - मेलद्वारे पाठविण्यात आली असल्याचेही पत्रात नमुद आहे. असे असतानाही वर्धा जिल्ह्यात शिक्षण विभागाने मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांना केवळ एकच प्रश्नपत्रिका पाठवून पायाभूत चाचणी घेण्याचे सूचित केले आहे. यामागे शिक्षण विभागाची भूमिका मात्र न समजणारी असल्याचा सूर या इंग्रजी शाळांमधून ऐकायला येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी) पायाभूत चाचणीमागील शासनाचा हेतूराज्याबाहेरचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या अन्य बोर्डाच्या शाळांमधून (सीबीएसई, आयबीएसई व आयबी) पायाभूत चाचण्या घेतल्या जात नाही. यामुळे सरल प्रणालीमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर ‘०’ गुण प्राप्त झाल्याचा आभास निर्माण होईल. हे राज्याच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या धोरणाशी विसंगत आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधून पायाभूत चाचणीचे आयोजन करण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या योजनेमध्ये इंग्रजी माध्यमांच्या खासगी कायम विनाअनुदानित शाळांचाही अंतर्भाव केला. ही बाब महत्त्वाची आहे. मात्र या शाळांना एकच प्रश्नपत्रिका दिली आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी त्याची सत्यप्रत काढण्याची मौखिक सूचना शिक्षण विभागाने दिली. ही बाब अन्यायकारक आहे. हा खर्च साधारणत: १५ ते २० हजार रुपयांच्या घरात जातो. याची कुठलीही तरतुद शाळेच्या अर्थसंकल्पात राहात नाही. अशा परिस्थितीत या चाचणी घेणे अडचणीचे दिसत आहे.- मोहन राईकवार, जिल्हाध्यक्ष, मेस्टा वर्धा.