धक्कादायक! गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडून हत्या जवानाची आत्महत्या; पुलगावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 11:09 IST2020-07-02T11:09:00+5:302020-07-02T11:09:28+5:30

पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या करत स्वत: वरही गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे.

Shocking! Suicide of a soldier who shot his pregnant wife; Incidents in Pulgaon | धक्कादायक! गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडून हत्या जवानाची आत्महत्या; पुलगावातील घटना

धक्कादायक! गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडून हत्या जवानाची आत्महत्या; पुलगावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या करत स्वत: वरही गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. मृत सैनिकाचे नाव अजय कुमार सिंह (25) आणि मृत पत्नीचे नाव प्रियंका कुमारी (26) आहे. हे दोघेही मूळचे बिहार राज्यातले आहेत. दोन वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. तर पत्नी गरोदर होती. हा सैनिक ड्युटीवरून पाणी पिण्याच्या बहाण्याने गायब होत घरी आला. त्यानंतर त्याने इंसास रायफलने गर्भवती पत्नीवर गोळी झाडत हत्या केली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचाही सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. या खळबळजनक घटनेने संपूर्ण वर्धा हादरला आहे.

Web Title: Shocking! Suicide of a soldier who shot his pregnant wife; Incidents in Pulgaon