धक्कादायक! कुराण शिकण्यासाठी आलेल्या चिमुकलीचा मौलवीने केला विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 21:05 IST2022-01-24T21:04:44+5:302022-01-24T21:05:09+5:30
Wardha News कुराण शिकण्याकरिता मशीदमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मौलवीनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरालगत एका मशीदमध्ये उघडकीस आली.

धक्कादायक! कुराण शिकण्यासाठी आलेल्या चिमुकलीचा मौलवीने केला विनयभंग
वर्धा : कुराण शिकण्याकरिता मशीदमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मौलवीनेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शहरालगत एका मशीदमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मौलवीला अटक करण्यात आली.
मोहम्मद अस्लम रझा मोहम्मद इसराईल (२९) रा. नुरी असे आरोपीचे नाव आहे.तो एका मशीदमध्ये कुराण शिकविण्याचे काम करतो. त्याच्याकडे अल्पवयीन मुलगी विद्यार्थिनी म्हणून कुराण शिकण्याकरिता जात होती. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजतादरम्यान नेहमीप्रमाणे कुराण शिकण्याकरिता गेली असता आरोपी मौलवीने मशीदच्या बाजूला असलेल्या खोलीत नेऊन विनयभंग केला. ही बाब तिने आईजवळ सांगितली. पीडितेच्या आईने सावंगी पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रविवारी मौलवीला अटक केली. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत.