शिवाजी कॉलनीत धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:35 IST2019-03-07T23:34:44+5:302019-03-07T23:35:13+5:30

शिवाजी कॉलनी येथील सराफा व्यावसायिक सुनील जगन्नाथ बेलपांडे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने घरातून सात लाखांच्या दागिन्यांसह ८ हजार रूपये रोख लंपास केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली.

Shivaji Colony brave theft | शिवाजी कॉलनीत धाडसी चोरी

शिवाजी कॉलनीत धाडसी चोरी

ठळक मुद्दे७ लाखांचे दागिने पळविले : दाराचा कोंडा तोडून घरात केला प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शिवाजी कॉलनी येथील सराफा व्यावसायिक सुनील जगन्नाथ बेलपांडे यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने घरातून सात लाखांच्या दागिन्यांसह ८ हजार रूपये रोख लंपास केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, सुनील बेलपांडे हे पत्नी, मुलगा व मुलगीसह येथे राहतात. त्यांचे शहरात ज्वेलरीचे दुकान आहे. दोन्ही मुले नागपूरला शिकत आहेत. त्यामुळे पत्नी एकट्याच घरी राहतात. आज सुनील बेलपांडे हे दुकानात गेले व दुपारी पत्नी चंदा या आपटी फाटा येथील महाकाली मंदिरात गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडचे फाटक उघडून घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने व ८ हजार रूपये रोख लंपास केली. सुनीलच्या पत्नी चंदा या परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेची पुलगाव पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस कचेरीत संपर्क साधला असता कुठलीही घटना नसल्याचे सांगण्यात आले, हे विशेष.

Web Title: Shivaji Colony brave theft

टॅग्स :Thiefचोर