शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शहराला आले गोठ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 6:00 AM

बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही.

ठळक मुद्देरहदारी असुरक्षित : चौक आणि विविध रस्त्यांवर जनावरांचा कब्जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील विविध रस्त्यांवर जनावरांकडून अघोषित ‘रास्तारोको’ केला जात असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडत असून रहदारी असुरक्षित झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रक पोलिस शाखेचे सोईस्कर दुर्लक्ष आहे.पावसामुळे निर्माण होणारे चिखलमय वातावरण म्हणून पावसाळ्यात दरवर्षीच पाळीव, मोकाट जनावरे शहरातील महत्त्वपूर्ण आर्वी नाका चौक, आरती चौक, धुनिवाले चौक, आर्वी मार्ग, शहरातून जाणारा एकमेव प्रमुख मार्ग आदी ठिकाणी दररोज जनावरांचे कळप रस्त्यावर असतात. एकावेळी १५ ते २० व त्यापेक्षा जनावरे रस्त्यावर, चौकात उभी राहत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच वाट काढावी लागत आहे. यात सांडही राहत असल्याने बऱ्याचवेळा जनावरांच्या टक्कर होतात. ठाकरे मार्केटसमोरील व आर्वी मार्गावर हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे-घेणे नाही. या जनावरांना ते पहाटेच गोठ्याबाहेर काढतात. ही जनावरे थेट शहर गाठत विविध ठिकाणी ठाण मांडून बसतात. वाहनचालकांनी हॉर्न वाजवूनही ती जागची हलत नाहीत. यापूर्वी या मोकाट, पाळीव जनावरांमुळे अनेक अपघात झाले आहेत.मोकाट, पाळीव जनावरांचा बंदोबस्त करून दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेचा अधिकार असताना, हा विभागही झोपेत आहे. त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला नाही.पाच-दहा कि.मी. च्या परिघात हजारावर जनावरेशहरातील पाच-दहा किलोमीटरच्या अंतरात दररोज हजारावर जनावरे ठाण मांडून बसत आहेत. यामुळे वाहनधारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहेत. निम्म्या रस्त्यावर जनावरांचा कब्जा, याचवेळी विरुद्ध दिशेने मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकांना वाट कोठून काढावी, असा प्रश्न पडतो. मोकाट जनावरांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वर्धेकर नागरिकांंनी केली आहे.वाहतूक पोलिस दंडवसुलीत व्यस्तवाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांची आहे. असे असताना शहरातील अनेक चौकात वाहतूक पोलिस शोधूनही सापडत नाहीत. जेथे कर्तव्यावर आहेत, तेथे वाहतूक सुरळीत करण्याचे काम न करता केवळ दंडवसुलीत मग्न असतात.जनावरांची धरपकड मोहीम नाहीचमोकाट जनावरे आणि श्वानांनी शहरात हैदोस घातला असताना पावसाळा संपत आला तरी पालिकेकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. गतवर्षी पालिकेने जनावरांची धरपकड करून पशुपालकांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी मात्र, नगरपालिकेचा संबंधित विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. एखाद्या अपघाताची पालिकेला प्रतीक्षा असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया अभियंता नीरज पाबळे यांनी व्यक्त केली.