वर्धा जिल्ह्यात चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 16:14 IST2020-02-21T16:13:59+5:302020-02-21T16:14:58+5:30
चॉकलेट व इतर वस्तूंचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना त्याच्या तक्रारीनंतर पवनार येथे उघडकीस आली आहे.

वर्धा जिल्ह्यात चॉकलेटचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
ठळक मुद्देआरोपीला अटकपवनार येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: चॉकलेट व इतर वस्तूंचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना त्याच्या तक्रारीनंतर पवनार येथे उघडकीस आली आहे. पिडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी खेमराज शामराव वैद्य, रा. पवनार याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी व पिडिता हे एकाच गावातील रहिवासी आहेत. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. याचाच फायदा घेऊन त्याने पिडितेला चॉकलेट व इतर वस्तूंचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. तसेच तिचा विनयभंग केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून आरोपीला अटक केली आहे.