शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

दुष्काळाची ‘भीषणता’, उपाययोजनांची ‘विषमता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 2:05 PM

मागील वर्षी झालेले अल्प पर्जन्यमान आणि जलाशयाच्या गाळ उपस्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळाचे सावट चारा-पाण्याअभावी पावणे पाच लाख जनावरांची होरपळ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षी झालेले अल्प पर्जन्यमान आणि जलाशयाच्या गाळ उपस्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून निवारणार्थ प्रशासनाने आखलेल्या उपाययोजना गावापर्यंत पोहोचविण्याकरिता यंत्रणा कुचकामी ठरत आहे. परिणामी प्रशासनाच्या कागदोपत्री जिल्ह्यात सुकाळ दिसून येत असला तरी प्रत्यक्षात मात्र भिषणता कायम आहे.जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी ७०.४५ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. नद्यांना एकही मोठा पुर गेला नसल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरुवात झाली असून मे महिन्या पहिल्या आठवडयात पाणीकोंडीचा अनुभव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या जलाशयातही सरासरी १७ टक्केच पाणी शिल्लक असल्याने पाणीपुरवठाही प्रभावित झाला आहे. शहरांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठाही ठप्प असल्याने नागरिकांना दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. नागरिकांना पिण्याकरिता तसेच जनावरांकरिताही पाण्याची गरज असल्याने पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.समृद्धी महामार्ग आणि नागपूर- तुळजापूर महामार्गासह राष्ट्रीय महामार्गाचे आणि जिल्ह्यांतर्गत मार्गाचे सिमेंटीकरणही जोरात असल्याने त्याचाही पाणी टंचाईवर प्रभाव पडत आहे. शेतातील विहिरीतून १ हजार रुपये टँकरप्रमाणे मार्गांच्या कामासाठी पाणी खरेदी केले जायचे त्याचे दरही आता वाढले आहे. तसेच पाण्याची पातळीही खोल जात असल्याने गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सार्वजनिक विहिरी, हातपंप यांनाही या दुष्काळी परिस्थितीत अच्छे दिन आले असले तरी भूर्गभातच पाणी नसल्याने तेही कोरडेठाक झाले आहे. तसेच शेत शिवारातील विहिरी आणि नालेही आटल्याने शेतकऱ्यांचे सिंचन बंद आहे. त्यामुळे हिरवा आणि वाळल्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. सोबतच पिण्याचाही प्रश्न गंभीर असल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील बैल, गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या असे एकूण ४ लाख ८५ हजार १७९ जनावरांची होरपळ होत आहे. या टंचाईच्या दिवसात डौलदार दिसणारी जनावरे रोडके झाले असून चाऱ्याअभावी त्यांचे पोट खपाटीला गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागाची जनवारे अल्पदरात विकायला सुरुवात केली आहे. तर काहींनी जनावारांना चार महिन्यांकरिता दुसऱ्या गावी पाठविले आहे. आधी अल्प उत्पादन तर आता दुष्काळामुळे गोधन विकावे लागत असल्याने गोठ्यातील जनावरांचा खुटा एकटा पडला आहे. ही भवायह परिस्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रृ तरळताना दिसतात.

पारगव्हाण या गावापासून दहा कि.मी.अंतरापर्यंत पाण्याची कुठलीही सोय नाही. त्यामुळे गावकऱ्यांना हे अंतर पार करुनच पाणी मिळवावे लागते. प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. घरच्या वापराकरिता आणि जनवारांकरिता पाणी आता विकत घ्यावे लागत आहे. काहींना नाईलाजास्तव चांगली जनावरे विकावी लागत आहे.ज्ञानेश्वर बेले, ग्रामस्थ, पारगव्हाण, आष्टी (श.)

आमचा पिढीजात दुग्धव्यवसाय असून यावरच परिवाराचा उदनिर्वाह चालतो. आतापर्यंत यावर्षीसारखा दुष्काळ बघितला नाही. माझ्याकडे ११ गायी,१८ म्हशी असून त्यांच्याकरिता २ ते ३ कि.मी. वरुन पाणी आणावे लागते. सोबतच चाऱ्याचीही टंचाई असल्याने आता हा पिढीजात व्यवसाय अडचणीत आला आहे. आता कसे जगावे, कोणता व्यवसाय करावा हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.महादेव घोडे, गोपालक, सेलगाव(उमाटे), कारंजा (घा.)

टॅग्स :water shortageपाणीटंचाई