शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी सात पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:00 IST

रविवारी पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती वर्धा शहरातील गोंड प्लॉट भागातील रहिवासी असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात आल्याने त्यांचे चार वर्षीय दोन मुलं, एक आठ वर्षीय मुलगी तसेच ३८ वर्षीय पत्नीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात खळबळ : दोन महिला तर पाच पुरुष, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीसह मुलांनाही संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाला रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार तब्बल सात नवीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. या नवीन रुग्णांमध्ये दोन महिला तर पाच पुरुषांचा समावेश आहे. मागील चार महिन्यांत एकाच दिवशी सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने सात नव्या कोरोना रुग्णाच नोंद घेतली असली तरी यापैकी एक बिहार येथील आहे. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बिहार सरकारला दिली आहे.रविवारी पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती वर्धा शहरातील गोंड प्लॉट भागातील रहिवासी असून सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून तो सील करण्यात आला आहे. कोरोना बाधित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात आल्याने त्यांचे चार वर्षीय दोन मुलं, एक आठ वर्षीय मुलगी तसेच ३८ वर्षीय पत्नीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे. तर आर्वी येथील रामदेवबाबा वॉर्ड भागातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत काम करणाऱ्या ३९ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील पाच रुग्णांना सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात तर दोन व्यक्तींना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.आर्वीतील रुग्ण भाजी विक्रेताआर्वी शहरातील रामदेवबाबा वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या २३ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. सदर रुग्ण भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होता. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने तो शासकीय रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आज आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.दुसºया दिवशीही पाळला जनता कर्फ्यूकोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वर्धा शहरासह नजीकच्या नऊ ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात तीन दिवसीय सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करून या परिसरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी केले. त्यांच्या आवाहनाला रविवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही वर्धेसह परिसरातील नागरिकांनी घरात राहून स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.जिल्ह्याची रुग्णसंख्या ४३रविवारी सात व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असले तरी त्यापैकी एक व्यक्ती हा बिहार राज्यातील आहे. आज सहा कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांचे संख्या ४३ झाली आहे. एकाच दिवशी सात व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.केवळ सुरू राहिले मेडिकल्स आणि खासगी रुग्णालयेसंचारबंदीचा दुसरा दिवस असलेल्या रविवारी वर्धा शहरासह परिसरातील नऊ ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात केवळ मेडिकल्स आणि रुग्णालय सूरू होती. तर इतर दुकाने व्यावसायिकांनी बंद ठेवली होती.आठ व्यक्तींना भोवला पिपरी(मेघे)तील विवाहसोहळासावंगी (मेघे) येथील एका खासगी विद्यालयात खेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आणि पिपरी (मेघे) येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाच्या लग्नात सहभागी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा कोविड अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. हा नवीन रुग्ण गोंड प्लॉट येथील रहिवासी असून या नव्या रुग्णामुळे लग्न सोळ्यातील कोविड बाधितांची संध्या आता आठ झाली आहे.पिपरीच्या लग्नामुळे ग्रामीण भागात एन्ट्रीपिपरी (मेघे) येथील विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी आतापर्यंत नवरदेव, नवरी, नवरीनच्या दोन मैत्रिणी, नवरदेवाची आई, नवरदेवाचा मामेभाऊ आणि मामे बहीण, मामा असे एकूण आठ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. पिपरीच्या या लग्नामुळे ग्रामीण भागातही कोरोनाची एन्ट्री झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या