सेवाग्राम हे तीर्थस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:10 AM2018-10-11T00:10:47+5:302018-10-11T00:12:22+5:30

आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.

Sevagram or pilgrimage center | सेवाग्राम हे तीर्थस्थान

सेवाग्राम हे तीर्थस्थान

googlenewsNext
ठळक मुद्देकिरणकुमार : गांधी १५० जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आम्ही किती सिंथेटिक झालो आहोत, आपले मन रियॅक्ट करीत नाही. परंतु आपण सेवाग्राम येथे आलो असता मन भरुन आलं, मन रियॅक्ट करुन गेले. शतकातील महामानवाचे साधेपणा, सहजपणा,सरळपणा त्यांच्या जीवनातून दिसून आली.आम्ही ट्रम्प आणि इमरान खान यांच्या बाबतीत सर्व काही माहिती करुन घेतो. परंतु या महामानवाचे जीवन चरित्र समजून घेत नाही हे दुर्दैव आहे. अहिंसेचा पाठ घेऊन हिंसेवर विजय मिळविला. त्यांचे योगदानाचे मुल्य नाही. गांधी विचार संपूर्ण विश्वाला दिला आहे. सेवाग्राम ही त्यांची कर्मस्थळी असल्याने हे तिर्थक्षेत्र असल्याचे मी मानतो असे प्रतिपादन अभिनेता किरणकुमार यांनी केले.
एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्रच्यावतीने आयोजीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य व एकता संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्याने अग्निहोत्री इंजिनीअरींग कॉलेज, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) वर्धा येथील सभागृहात महात्मा गांधी विचार मंथन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेता किरणकुमार मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, होते. एकता सेवा भावी मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष व फिल्म निर्माते अजमत खान, अभिनेता आफताब खान, मोहन अग्रवाल, ठाणेदार चंद्रकांत मदने, विनय राजे, अनिल नरेडी व प्राचार्य पडघम व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करतांना पं. अग्निहोत्री म्हणाले, प्रत्येकांनी गांधीजींचे  सिध्दांत आत्मसात करुन त्यांच्या विचारानुसार वाटचाल करावी. अनुभव हेच सिद्ध ज्ञान आहे. जो तत्त्व आणि आदर्श सोबत चालतो तोच पुज्यनीय असतो. चांगले कार्य करणाऱ्यांंचाच सत्कार होतो असे ते म्हणाले.
प्रास्ताविक अजमत खान यांनी केले संचालन आणि आभार इमरान राही यांनी मानले. यावेळी गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, निवृत्त कार्यकारी अभियंता के. आर. बजाज, माजी पोलीस आयुक्त, चंद्रकांत उदगीरकर, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. एम. नारंग, कवियत्री आभा पारगावकर, महेश बुधवानी, भारत राठोड, तुकाराम महाराज मुंढे, प्रकाश महाराज फड, संगीता जामगे, जयश्री देशमुख परभणी, प्रा. रफिक शेख,, डॉ. सुनील कुमार, अमरावती, राजाराम जाधव, उद्धवराव खेडेकर, जालना, किरण वाडिया, हिंगणघाट, डॉ. अनिल बेग, वर्धा व साहिस्ता परवीन अयुब खान, यवतमाळ यांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तर जय महाकाली शिक्षण संस्थेतर्फे अभिनेता किरण कुमार यांचा सत्कार संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित अभिनेता किरणकुमार यांनी बापूकुटीला भेट दिली.

Web Title: Sevagram or pilgrimage center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.