सेवाग्राम विकास आराखडा सर्वसमावेशक

By Admin | Updated: January 28, 2015 23:38 IST2015-01-28T23:38:18+5:302015-01-28T23:38:18+5:30

नियोजित सेवाग्राम विकास आराखडा हा शाश्वत विकासासाठी पूरक आहे. हा आराखडा सर्वसमावेशक असून वर्ध्याला विकसित बनविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील

Sevagram Development Plan Comprehensive | सेवाग्राम विकास आराखडा सर्वसमावेशक

सेवाग्राम विकास आराखडा सर्वसमावेशक

वर्धा : नियोजित सेवाग्राम विकास आराखडा हा शाश्वत विकासासाठी पूरक आहे. हा आराखडा सर्वसमावेशक असून वर्ध्याला विकसित बनविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन वॉशिंग्टन येथील सिस्टर सिटी आंतरराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष बिल बोरम यांनी केले़
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवाग्राम विकास आराखडाचे पॉवर पाँईट प्रेझेंटेशन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. वॉशिंगटन येथून आलेल्या बोरम यांच्यासमोर सेवाग्राम विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, नाबार्डच्या डॉ. स्रेहल बन्सोड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अनंत मिसे, आयटी पार्कचे संचालक विपीन भाटिया, व्यवस्थापक अब्दुल जुबेर, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे सोहम पंड्या, नागपूर फर्स्ट प्रकल्पाचे शैलेश देशपांडे, समाजसेवक श्रीकांत बारहाते, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे आदी उपस्थित होते.
वर्ध्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व सांगतानाच सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश करण्यात आलेल्या विविध बाबींचा तपशीलवार परिचय जिल्हाधिकारी सोना यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये करून दिला. जिल्ह्याची प्रशासकीय माहितीही करून दिली. वर्ध्याच्या विकासात भर घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध आवश्यक बाबींच्या नियोजित आराखड्यातील पैलूंची माहितीही त्यांनी दिली.
याप्रसंगी जिल्ह्यातील पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास आणि उपाय, शहरी विकास, ऐतिहासिक ठेवा, संस्कृती आदींबाबतही माहिती देण्यात आली़ बोरम यांच्याशी बारहाते यांनीही नियोजित विकास आराखडा आणि गांधी सिटी आराखड्यात आवश्यक असणारे महत्त्वाचे पैलू याबाबत सविस्तरपणे चर्चा केली. डॉ. करुणा करण, उत्तम गॅल्वाचे सुनील कत्याल आदींनीही चर्चेत सहभाग घेत मत प्रदर्शित केले़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Sevagram Development Plan Comprehensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.