सेलडोह-सिंदी महामार्ग पावसाळ्यात ठरेल अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST2020-05-29T05:00:00+5:302020-05-29T05:00:15+5:30
सेलडोह ते सिंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे काम एक-दीड वर्षापूर्वी एम. बी. पाटील अॅण्ड कंपनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते. या रस्त्याचे निरीक्षण व पाहणीकरिता ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक करण्यात आली. मात्र, रस्त्याचे केवळ खोदकाम करून मध्यभागात मुरूम पसरविण्यात आला आहे. वर्षभरापासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

सेलडोह-सिंदी महामार्ग पावसाळ्यात ठरेल अडचणीचा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : सेलडोह - सिंदी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (आय) च्या कामाकडे बांधकाम विभागासह संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष असल्याने आगामी पावसाळ्यात रस्त्यावर अपघाताचा बळावला आहे. रस्त्यालगत असलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्यांमुळे शेतात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सेलडोह ते सिंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे काम एक-दीड वर्षापूर्वी एम. बी. पाटील अॅण्ड कंपनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते. या रस्त्याचे निरीक्षण व पाहणीकरिता ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक करण्यात आली. मात्र, रस्त्याचे केवळ खोदकाम करून मध्यभागात मुरूम पसरविण्यात आला आहे. वर्षभरापासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. रस्ताकामात कंत्राटदाराकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे रस्त्याने प्रवास करणाºया प्रवाशांना धूळीसह खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी, दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत.
या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतच्या नागरिकांनी तक्रारी खासदार रामदास तडस यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहे. रस्ता खोदून ठेवल्याने पावसाळ्यात चिखल होऊन वहिवाट ठप्प होण्याची भीती आहे.
या रस्त्यालगत प्रभाकर कलोडे यांच्या शेतासमोर नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. त्याकरिता कलोडे यांचे शेतालगत मुरमाचे ढिगारे असल्याने पावसाळ्यात शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता कलोडे यांनी वर्तविली आहे. कंत्राटदाराने होणारे संभाव्य नुकसान टाळावे व पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.