‘त्या’ गुन्ह्यात वापरलेली कार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:18+5:30

लाखों रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी वाटेतच पळविल्याची तक्रार सुरेश बिहारी सतवाई रा. नागपूर यांनी कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यानंतर एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Seized used car in 'that' crime | ‘त्या’ गुन्ह्यात वापरलेली कार जप्त

‘त्या’ गुन्ह्यात वापरलेली कार जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देमहागडे साहित्याचे पार्सल पळविणे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ऑनलाईन पद्धतीने साहित्य विक्री करणाऱ्या कंपनीचे मोबाईल व एलसीडीचे पार्सल नागपूर येथून वाशीमच्या दिशेने नेल्यात येत होते; पण अद्यात चोरट्यांनी वाटेतच सदर साहित्य असलेल्या मालवाहू वाटेत अडवून त्यातील साहित्य लंपास केले. या प्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे. तर आता स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुने या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार मध्य प्रदेशातून जप्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, लाखों रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी वाटेतच पळविल्याची तक्रार सुरेश बिहारी सतवाई रा. नागपूर यांनी कारंजा (घा.) पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच कारंजा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. त्यानंतर एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली नव्हती. खात्रीदायक माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेची एक चमू मध्यप्रदेशात रवाना झाली. या चमूने देवास जिल्ह्यातील तिदावत गाव गाठून विना क्रमांकाची कार जप्त केली आहे. विशेष म्हणजे गुन्ह्याच्या दिवशी ही कार सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याचे खात्रीदायक सुत्रांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखडे, गजानन लामसे, मनिष कांबळे, राजू जयसिंगपूरे, नवनाथ मुंडे यांनी केली.

Web Title: Seized used car in 'that' crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.