शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी लाट; 24 एप्रिलला ऑक्सिजनचा सर्वाधिक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची एन्ट्री होताच कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली. शिवाय ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडही वाढविण्यात आले. कोविड रुग्णालयांवर वाढता ताण लक्षात घेता, केवळ गंभीर कोविड बाधितांनाच योग्य रेफर पद्धतीचा वापर करून कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आल्याने कोविड मृत्यू नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. असे असले तरी कोविडच्या दुसऱ्या लाट उच्चांकी गाठत असताना जिल्ह्यात रुग्णखाटांसह ऑक्सिजनचा तुटवडाच निर्माण झाला होता.

ठळक मुद्देतब्बल १८ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा झाला वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट सुमारे चारपट नागरिकांवर परिणाम करणारीच ठरली. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली, तरी कोविड उद्रेकाच्या काळात म्हणजेच कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करीत असताना, २४ एप्रिल हा दिवस आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडविणाराच ठरला. यादिवशी तब्बल १८ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागले. तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची एन्ट्री होताच कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली. शिवाय ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडही वाढविण्यात आले. कोविड रुग्णालयांवर वाढता ताण लक्षात घेता, केवळ गंभीर कोविड बाधितांनाच योग्य रेफर पद्धतीचा वापर करून कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आल्याने कोविड मृत्यू नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. असे असले तरी कोविडच्या दुसऱ्या लाट उच्चांकी गाठत असताना जिल्ह्यात रुग्णखाटांसह ऑक्सिजनचा तुटवडाच निर्माण झाला होता. तर सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावल्याने कोविड रुग्णालयातील खाटा रिक्त आहेत.  तर कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

मृत्यू तांडव बघून उडाली कोविड योद्धांची झोप- कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करीत असताना, तसेच एकाचदिवशी १८ मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागत असल्याने प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर तसेच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झोपच उडाली होती.

जिल्ह्यात सध्या नवीन काेविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली, तरी कोविड संकट कायम आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.- अर्चना मोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

९३२ रुग्णांची पडली हाेती भर

- २४ एप्रिल यादिवशी १८ मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागले; तर याचदिवशी तब्बल ९३२ नवीन रुग्णांची भर पडल्याने त्या दिवशी जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने ३० हजार ६७७ चा आकडा पार केला. - विशेष म्हणजे यादिवशी ३८ व्यक्तींचा कोविडने बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती; तर सध्या जिल्ह्याची कोविड परिस्थिती नियंत्रणात असून, जिल्ह्यात केवळ १५ ॲक्टिव्ह कोविडबाधित आहेत. असे असले तरी, कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजन