The second ‘Siro Survey’ in October? | ऑक्टोबरमध्ये होणार दुसरा ‘सिरो सर्व्हे’?

ऑक्टोबरमध्ये होणार दुसरा ‘सिरो सर्व्हे’?

ठळक मुद्देचर्चा सुरू : हर्ड ह्युमिनिटीची मिळणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विषाणूचा संसर्ग वाढू देऊन किंवा रोगप्रतिबंधात्मक लस देणे या दोन पद्धतीचा अवलंब करून हर्ड ह्युमिनिटी विकसित केली जाते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तसेच ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात कोविडचा अधिक प्रसार होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. परिणामी, कोविड-१९ विषणूच्या संसर्गाचा बारकाईने अभ्यास करण्यासह वर्धेकरांमध्ये किती प्रमाणात हर्ड ह्युमिनिटी विकसित झाली याची इत्यभूत माहिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात दुसरा सिरो सर्व्हे होण्याची शक्यता आहे. सध्या त्यासाठी आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत करण्यात आले. त्याचा अहवाल १९ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात झालेल्या पहिल्या सिरो सर्व्हेच्या अभ्यासातून अनेक ठोस माहिती आरोग्य विभागाला तसेच वैद्यकीय तज्ज्ञांना प्राप्त झाली आहे. यात प्रमुख म्हणजे १ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात २०५ कोविड बाधित ट्रेस झाले असताना सुमारे २१ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते प्रमाण केवळ १.५० टक्के होते. शिवाय रोग प्रतिकारकशक्ती तयार होण्यास अद्यापही बराच कालावधी लागणार असल्याचे सिरो सर्व्हेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. तर आॅगस्ट महिन्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नेमकी काय आहे यासह संसर्गाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दुसरा सिरो सर्व्हे करण्याचे सध्या आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी आरोग्य विभाग आणि सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेतील बड्या अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा होत आहे. असे असले तरी जिल्हाधिकाºयांनी हिरवी झेंडी दिल्यावर दुसरा सिरो सर्व्हे वर्धा जिल्ह्यात होणार असल्याचे सांगण्यात आले.

२,४०० व्यक्तींच्या रक्ताचे घेणार नमुने
पहिल्या सिरो सर्व्हेदरम्यान एकूण २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तर दुसºया सिरो सर्व्हेदरम्यान सुमारे २ हजार ४०० व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन केल्या जाण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पहिला सिरो सर्व्हे करण्यात आला आहे. तर दुसरा सिरो सर्व्हे नेमका केव्हा करावा याबाबत सध्या चर्चा केली जात आहे. जिल्हाधिकाºयांच्या परवानगीनंतर दुसरा सिरो सर्व्हे करण्यात येईल.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

कोविड-१९ या विषाणूच्या संसर्गाची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे उपयुक्त ठरणारा आहे. पहिल्या सिरो सर्व्हेचा अहवाल आम्ही जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. तर दुसरा सिरो सर्व्हे नेमका केव्हा करायचा यासाठी सध्या आरोग्य विभागातील बड्या अधिकाºयांसोबत चर्चा केली जात आहे. चर्चेअंती योग्य निर्णय घेऊन जिल्हाधिकाºयांच्या परवानगीने कदाचित आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस दुसरा सिरो सर्व्हे करण्यात येईल.
- डॉ. नितीन गगणे, अधिष्ठाता, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.

Web Title: The second ‘Siro Survey’ in October?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.