लहानग्यांपासून मोठ्यांनाही स्कूबीचे वेड
By Admin | Updated: February 1, 2015 23:01 IST2015-02-01T23:01:16+5:302015-02-01T23:01:16+5:30
सध्या शाळकरी विद्यार्थीच नाही तर काही मोठी मंडळी देखील ‘स्कूबी’ या प्रकाराने वेडावत असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकचे रंगीत धागे घेऊन जो तो विणताना सतत नजरेस पडत आहे.

लहानग्यांपासून मोठ्यांनाही स्कूबीचे वेड
दिलीप चव्हाण - सेवाग्राम
सध्या शाळकरी विद्यार्थीच नाही तर काही मोठी मंडळी देखील ‘स्कूबी’ या प्रकाराने वेडावत असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकचे रंगीत धागे घेऊन जो तो विणताना सतत नजरेस पडत आहे. आॅटोत बसल्यावर, वर्ग सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुटीतही हा प्रकार सुरू आहे. प्रत्येकजण काहीतरी विणताना सतत पहावयास मिळत आहे.
सर्व काम बाजूला सारून वेगवेगळ्या माळा करण्यात बालके गढून गेल्याचे दिसते. विचार शक्तीला यामुळे चालना मिळत असली तरी सतत त्याचाच ध्यास घेतल्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. माहिती व तंत्रज्ञानानाच्या युगात लहान मुले टिव्ही, मोबाईल, संगणक आदीमुळे वेडी झाल्याचे पहावयास मिळते. याचा विपरित परिणाम होत मुले मैदानी खेळ विसरत आहेत. त्यातच सध्या एका नव्या कलेची भर पडली आहे. सर्वत्र सध्या स्कूबी या कला प्रकाराचे प्रचंड वेड मुलांमध्ये दिसत आहे. ज्याच्या त्याच्या हाती प्लास्टिकचे रंगीत धागे असून जो तो विणकाम करण्यात व्यस्त आहे.