शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचा तुटवडा; शेतकरी हैरान

By admin | Updated: September 18, 2014 23:39 IST

खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही.

आर्वी : खरीप हंगाम अर्ध्यावर आला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु येथील कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी पेरणी विलंबाने केली आहे. आता खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होत आहे. खताची उपलब्धता करुन देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांची डवरणी व फवारणीची कामे आटोपली आहे. आता पिकांची जोमदार वाढ असते. पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असल्याने या पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या तालुक्यातील कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना युरिया न घेताच आल्या पावली परतावे लागते. हे चित्र तालुक्यातील अनेक गावात पहायला मिळते. यावर्षी खरीप हंगामातील बराचसा काळ पावसाच्या विलंबाने वाया गेला. पावसाच्या आगमानानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतरही काहीकाळ पाऊस गडप झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. अखेर पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता पिकांची स्थिती समाधानकारक असताना पिकांना द्यायला खत नसल्याने शेतकऱ्यांत चिंता व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने उर्वरीत पिकातून माफक उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजाराच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)