सरपंच, आरोग्य कर्मचाऱ्यांसह १८ व्यक्ती कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:07+5:30

आरोग्य उपकेंद्रातील दोन्ही आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य उपकेंद्राचे कामकाज एकट्या आरोग्य अधिकाऱ्याला सांभाळावे लागत आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात काम करताना आरोग्य अधिकाऱ्याची तारांबळ उडत आहे, तर येथील अलोपॅथी दवाखान्यात कार्यरत औषध निर्माण अधिकाऱ्याचीही दीड महिन्यांपासून सिंदी (रे) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावल्याने येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Sarpanch, health workers and 18 others were injured | सरपंच, आरोग्य कर्मचाऱ्यांसह १८ व्यक्ती कोरोनाबाधित

सरपंच, आरोग्य कर्मचाऱ्यांसह १८ व्यक्ती कोरोनाबाधित

ठळक मुद्देकेळझरात आरोग्य यंत्रणेची मदार एकाच अधिकाऱ्यावर : गृहविलगीकरणात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : सरपंच, आरोग्य सेवक यांच्यासह एकूण १८ जणांना गावात कोरोनाची बाधा झाली. हे सर्व बाधित रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.   यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून, एकाच अधिकाऱ्यावर मदार आहे.
आरोग्य उपकेंद्रातील दोन्ही आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य उपकेंद्राचे कामकाज एकट्या आरोग्य अधिकाऱ्याला सांभाळावे लागत आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात काम करताना आरोग्य अधिकाऱ्याची तारांबळ उडत आहे, तर येथील अलोपॅथी दवाखान्यात कार्यरत औषध निर्माण अधिकाऱ्याचीही दीड महिन्यांपासून सिंदी (रे) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावल्याने येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे २५ एप्रिलपासून येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्याने आणखी कामाचा ताण वाढला आहे. ग्रामीण भागात पहिल्या लाटेचा  प्रभाव जाणवला नव्हता मात्र दुसऱ्या लाटेत नागरिकांची होरपळ होत असल्याचे दिसून येत आहे. 

मानधन नाही तर काम नाही; आशा वर्करने घेतली भूमिका

आरोग्य उपकेंद्रात एकूण सहा आशा वर्कर काम करीत आहेत. कोरोनाकाळापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून चोखपणे त्या कर्तव्य बजावत आहेत. पैकी दोन आशा सेविकांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येते. गावात अलीकडच्या काळात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आशा सेविकांनी आमचा व आमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून विनामानधन यापुढे काम करणार नसल्याची भूमिका घेत तीन दिवसांपासून कामावर जाणे बंद केले आहे. ग्रामपंचायतीने मानधन द्यावे, अशी आशा सेविकांची मागणी आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्र सध्या आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांशिवाय ‘सायलेंट मोड’वर आले आहे. याचा परिणाम कोविडच्या कामावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्य उपकेंद्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने होम क्वारंटाईन आहेत, तर आशा सेविकांनी मानधन देणार असाल, तरच काम करणार, अशी भूमिका घेतल्याने कामाचा भार एकट्यावर आला आहे.
-डॉ. पुष्पा छाडी, 
आरोग्य अधिकारी, केळझर.

 

Web Title: Sarpanch, health workers and 18 others were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.