शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण अनुमतीमुळे रखडले वाळूघाटांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST

राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत असल्याने अनेकांनी कामांना थांबा दिला आहे.

ठळक मुद्देअवैध उपसा सुरूच : दामदुप्पट दरामुळे बांधकामे खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन वाळू निर्गती धोरणानुसार यावर्षी राज्यातील सर्वच जिल्ह्यांनी वाळूघाटांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर लवकरच वाळूघाटांचे लिलाव होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, मार्च महिना उजाडला तरीही वाळूघाटांच्या लिलावाकरिता निकषांअभावी पर्यावरणाची अनुमती प्रलंबित असल्याने घाटांचे लिलाव रखडले आहे. त्यामुळे शासकीय बांधकामासह खासगी बांधकामालाही थांबा देण्यात आला आहे.राज्यभरात वाळूघाटांचे लिलाव झाले नसले तरीही अवैधरीत्या वारेमाप वाळूचा उपसा सुरू आहे. त्याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाचीही दमछाक होत आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाळूमाफिया दामदुपटीने ग्राहकांना विकत आहे. त्यामुळे बांधकामाचेही आर्थिक बजेट बिघडत असल्याने अनेकांनी कामांना थांबा दिला आहे. मार्च एंन्डिग असल्यामुळे शासकीय कामांना गती देण्याची गरज असतानाच वाळूअभावी शासकीय बांधकामेही रखडली आहेत. वाळूअभावी इमारत बांधकाम रखडल्याने कंत्राटदार, बांधकाम मजूर यांच्यावरही मोठे संकट ओढवले. अवैधरीत्या उपसा सुरू असल्याने आधीच वाळू घाट घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातही घाट लिलाव होईपर्यंत महसूल विभागाने मोजमाप केला तेवढाही साठा शिल्लक राहील की नाही, ही शंकाच आहे. लिलावाला उशीर झाला तर यात शासनाचाही महसूल बुडण्याची शक्यता असल्याने वाळू घाटांचा लिलाव करण्याची मागणी होत आहे.एक वर्षासाठी मिळणार वाळूघाटनवीन वाळू निर्गती धोरणानुसार वाळूघाटांचा पाच वर्षांकरिता लिलाव करण्याचे ठरविण्यात आले होते. याकरिता वाळूघाटांचे क्षेत्र पाच हेक्टरपर्यंत असणे आवश्यक आहे. या नव्या नियमानुसार तालुकास्तरीय तांत्रिक समित्यांद्वारे वाळूघाटांचे सर्वेक्षण व घाटांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, बहुतांश जिल्ह्यामध्ये एकत्रीकरण केल्यानंतरही पाच हेक्टरपर्यंत वाळूघाट जात नसल्याने एक वर्षाकरिताच लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, अद्याप लिलावाकरिता आवश्यक असलेल्या पर्यावरणाच्या अनुमती प्रलंबित असल्याने वाळू घाटांच्या लिलावकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात तालुकास्तरीय तांत्रिक समित्यांद्वारे प्रत्येक तालुक्यातील वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही घाटांचे एकत्रीकरण करून उत्खननाकरिता योग्य असलेल्या वाळूघाटांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. आता पर्यावरण अनुमती प्राप्त होताच वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया राबविली जाईल.- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.