शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

रेती तस्करीचा पर्दाफाश, सव्वाकोटींचा माल जप्त

By रवींद्र चांदेकर | Published: May 03, 2024 3:32 PM

Wardha : पोलिसांची कारवाई; वणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा

वडनेर (वर्धा) : हिंगणघाट पोलिसांनी तालुक्यातील कवडघाट परिसरात नाकेबंदी करून टिप्पर, ट्रकची तपासणी केली. यात टिप्पर, ट्रकमध्ये अवैध रेती आढळल्याने रेतीसह एक कोटी ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली.

पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यावरून हिंगणघाटच्या ठाणेदार तथा परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचला. गुन्हे प्रगटीकरण पथकाने कवडघाट येथे हिंगणघाट ते वर्धा रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान तीन टिप्पर व एक एलपी १६ चाकांचा ट्रक थांबवून त्यांची तपासणी केली. टिप्पर आणि ट्रकमध्ये रेती आढळल्याने चालकांना रेती कोठून आणली, अशी विचारणा केली. रेतीच्या राॅयल्टीबाबतही विचारपूस केली. चालकांनी दारोडा शेतशिवारातील वणा नदीपात्रातून रेती आणल्याचे सांगितले. मात्र, रॉयल्टी नसल्याचे कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही टिप्पर व एक ट्रक ताब्यात घेतला. चालक व क्लीनर यांनाही ताब्यात घेण्यात आले.

तीन टिप्पर व ट्रकमध्ये अंदाजे ४३ ब्रास रेती होती. प्रतिब्रास सहा हजार रुपयांप्रमाणे पोलिसांनी दोन लाख ५८ हजारांची रेती आणि तीन टिप्पर, एक ट्रक जप्त केला. रेतीसह टिप्पर (क्रमांक एमएच- २७, बीएक्स- ६६९१), (एमएच- ३७, डीजी- ५७७०), (एमएच- २७/७, बीएक्स- ६४९४) आणि ट्रक (क्रमांक एमएच- २७, बीडी- ७९८२), एक मोबाइल असा एकूण एक कोटी ३३ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सय्यद आसीफ अली सय्यद साहेबअली (३५), सलीम वहीद खा पठाण (२५, दोन्ही रा. कठोरा- गांधी, ता.जि. अमरावती), प्रफुल्ल उत्तमराव केने (३८, रा. प्रवीणनगर, अमरावती), कुणाल मोहनराव घुले (२८, रा. राहाटगाव, ता.जि. अमरावती), वृत्तिक रमेश साबळे (२१, रा. अनकवाडी, ता. तिवसा, जि. अमरावती), आदेश मुंडे (रा. रघुनाथपूर, ता. तिवसा, जि. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले.

जप्त केलेले टिप्पर, ट्रक मिलिंद जवंजाळ (रा. नांदगाव पेठ, जि. अमरावती), सचिन निस्ताने (रा. राहाटगाव, जि. अमरावती) आणि आकाश डेहणकर (रा. मोझरी, जि. अमरावती) यांच्या मालकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही रेतीची वाहतूक करीत हातो, असेही चालकांनी सांगितले. त्यावरून चालकांसह त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर अधीक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन पोलिस अधिकारी वृष्टी जैन, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, हवालदार प्रवीण देशमुख, सुनील मळणकर, सुनील मेंढे, नरेंद्र आरेकर, विजय हारनूर, जफर शेख यांनी केली.

ताब्यातील पाचपैकी एकाला सोडले

पोलिसांनी रेती तस्करीप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे रॉयल्टीची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांच्यापैकी एकाकडेच रॉयल्टी आढळल्याने त्याला पोलिसांनी सोडून दिले. उर्वरित चारजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता पोलिस टिप्पर व ट्रकमालकाच्या शोधात आहेत. पोलिस उपनिरीक्षक भारत वर्मा पुढील तपास करीत आहेत. लवकरच मालकांचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. मात्र, रेती तस्करीला पाठबळ कुणाचे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय रेती तस्करी शक्य नसल्याची परिसरात चर्चा आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारwardha-acवर्धाSmugglingतस्करी