शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टी पासकरिता नियमावलीला तिलांजली

By admin | Updated: December 18, 2014 22:59 IST

गौणखनिज वाहतुकीला लागणाऱ्या रॉयल्टी पास तहसील कार्यालयाकडून दिल्या जातात; पण गत १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या नवनियुक्त तहसीलदार स्मीता पाटील तुघलकी निर्णयाने यंत्रणाच अवाक् झाली आहे.

आष्टी (शहीद) : गौणखनिज वाहतुकीला लागणाऱ्या रॉयल्टी पास तहसील कार्यालयाकडून दिल्या जातात; पण गत १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या नवनियुक्त तहसीलदार स्मीता पाटील तुघलकी निर्णयाने यंत्रणाच अवाक् झाली आहे. रॉयल्टी पास देण्याबाबत नियमावली शासन निर्धारित आहे़ शासनाच्या नियमांना तिलांजली देत जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर १५ दिवसांनी रॉयल्टी मिळेल, असा आदेश प्रस्तुतकार-१ या लिपिकाने जारी केला़ यामुळे खुलेआम चोरट्या मार्गाने गौणखनिजाची लूट सुरू आहे. रॉयल्टी देण्यासाठी वेगळे नियम का, असा प्रश्न संबंधित कंत्राटदार व गौणखनिज विके्रते उपस्थित करीत आहेत.विनारॉयल्टी वाहतूक केल्यास वाहन पकडून गुन्हा दाखल होतो. निर्धारित गौणखनिज किंमतीच्या तिप्पट दंडाची वसुली होते. यासाठी रॉयल्टी पास आवश्यक आहे. रॉयल्टी पासकरिता अर्ज केल्यावर संबंधित तलाठ्याकडून अहवाल घेवून चलान भरल्यावर रॉयल्टी मिळायची. आता मात्र या टेबलवर काम करणाऱ्या कडू नामक लिपिकाकडून पास घ्यावी लागते. लिपिकाकडून होणाऱ्या त्रासाच्या तहसीलदारांकडे अनेकांनी तक्रारी केल्या. हा कर्मचारी दुपारीच कपाटाला कुलूप लावून मोर्शी, जि. अमरावती येथील घरी निघून जात असल्याचाही आरोप आहे. शासनाने रॉयल्टी पासकरिता अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला. त्यात १५ दिवस मुदतीचा जाहीरनामा हा नियम तहसीलदार व लिपिकानी कुठून आणला हा चर्चेचा विषय आहे.(प्रतिनिधी)