देवळीत कापसाला ५५८१ रूपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:30 IST2018-10-20T00:29:27+5:302018-10-20T00:30:53+5:30
स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, .....

देवळीत कापसाला ५५८१ रूपये भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, देवळी बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापुरे, संचालक अयुब अली पटेल, सुशील तिवारी, प्रवीण ढांगे, नटवर मोकाती आदींची उपस्थिती होती.
मुहूर्ताचे दिवशी प्रति क्विंटल ५ हजार ५८१ रूपये भाव देवून दिवसभरात ४०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जीनिंगचे मालक माणक सुराणा व अमित सुराणा यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. सभापती खडसे यांचे हस्ते शेतकरी जावेद अली अजगर अली, सुनील फटींग, सुरेश घोडे, महेंद्र मकरंदे, राजू झिलपे आदींचा श्रीफळ, दुप्पटा व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सुंदरलाला सुराणा, नरेश अग्रवाल, शैलेश पाळेकर, पवन गोलछा, नेमीचंद घीया, विनोद घीया, पप्पू टावरी, अशोक सुरकार, बाबाराव कामडी, नगरसेवक मारोती, मरघाडे, अ. जब्बार तंवर, निरज ढोक, दीपक सेठिया, हरिष ओझा उपस्थित होते.