शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

‘सिग्नल्स’वर केलेला 50 लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. 

ठळक मुद्देवाहतूककोंडी झाली नित्याचीच : नियोजनशून्यतेचा शहरवासीयांना बसतोय फटका, कोण देणार लक्ष?

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी तसेच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या चौकांत पाच ते सहा वर्षांपूर्वी सिग्नल्स उभारण्यात आले. अंदाजे ५० लाख रुपयांचा खर्च या उपक्रमावर झाला. मात्र, हा उपक्रम फोल ठरला. प्रशासनाच्या नियोजशुन्यतेचा फटका शहरवासियांना बसला असून हा लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे, या एकमेव उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शहरात सिग्नल लावण्यासाठी अंदाजे ५० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. त्यानुसार, नगरपालिकेला याबाबत सूचना देवून शहरातील चौकांत सिग्नल लावण्याचे सांगितले. तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक शशिकांत भांडारे यांच्या देखरेखीत शहरातील बजाज चौक, आर्वीनाका, शिवाजी चौक, आरती चौक, धुनिवाले चौक आदी मुख्य चौकात सिग्नल उभारण्याचे काम सुरु झाले. सिग्नल लागलेही पण, मात्र, अवघ्या काही दिवसांत ते बंदही झाले. आज सुमारे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असूनही शहरातील सिग्नल मात्र, सुरु झालेले नाही. यामध्ये बांधकाम विभागाने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे उभारलेले सिग्नल पुन्हा काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा बसविण्यात आले, बांधकाम विभाग आणि पालिकेत समन्वयाचा अभाव आणि नियोजनशुन्यतेमुळे वर्धेकार आजही सिग्नल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सिग्नलवर झालेला लाखोंचा खर्च हा वाया गेल्याने ही भरपाई कोण करणार, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित विभागाकडून सिग्नल उभारणीवर झालेला खर्च किती लागला. हे तपासण्याची गरज आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तत्काळ याबाबतची चैाकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

जबाबदारी नेमकी कुणाची?सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करुन शहरात उभारण्यात आलेल्या सिग्नलची अवस्था आज बिकट झाली आहे. रस्ते निर्माण झाले पण, सिग्नलचे दिवे अजूनही बंदच आहे. झालेला खर्च व्यर्थ गेला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अधांतरीच राहिले. बांधकाम विभाग नगरपालिका आणि नगरपालिका बांधकाम विभागाला दोषी ठरवत जरी असले तरी नेमकी ही जबाबदारी कुणाची होती, हा उपक्रम बंद पडल्याने कितीचे लाखांचे काम झाले, कितीचे नाही, शिल्लक असलेला निधी कुणाकडे गेला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून याची चौकशी करणे गरजेचे आहे.

वाहतूक बुथ ठरतेय शोभेचेबजाज चौक आणि आर्वी नाका चौकात सिग्नल उभारणी केल्यावर वाहतूक पोलिसांसाठी बुथ तयार केले होते. मात्र, सिग्नल सुरुच न झाल्याने आजही ते वाहतूक बुथ आहे त्याच ठिकाणी पडून आहे. मोकाट श्वान आणि जनावरांसाठी ते बुथ सध्या निवासस्थान बनले आहे. चौकाच्या मध्यभागात उभारण्यात आलेले बुथ सध्या वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. 

काही सिग्नल चोरी, तर काही तुटलेआर्वीनाका चौकात आणि आरती चौकात लावलेले सिग्नल वादळी वाऱ्याने जमिनीवर पडले होते. अनेक दिवस सिग्नल रस्त्यावरच पडून होते. काही  लोखंडी दिवे चोरट्यांनी चोरुन नेले. तर जे दिवे जमिनीवर पडले होते त्यांना उचलुन नगरपालिकेच्या इमारत आवारात धुळखात ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक