शासनातर्फे ३.९९ कोटींची मदत : १५० जनावरांचा मृत्यू, ८५६० घरांची पडझड
By Admin | Updated: August 4, 2016 00:22 IST2016-08-04T00:22:38+5:302016-08-04T00:22:38+5:30
पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. ...

शासनातर्फे ३.९९ कोटींची मदत : १५० जनावरांचा मृत्यू, ८५६० घरांची पडझड
गौरव देशमुख वर्धा
पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन केले जाते. जिल्हा प्रशासन कुठल्याही स्थितीसाठी तयार असते. असे असले तरी नुकसान मात्र होतेच. गत तीन वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ४८ जणांना प्राण गमवावे लागले तर ५४ जण जखमी झाले. १५० जनावरांचा बळी गेला. शिवाय ८ हजार ५६० घरांची पडझड झाली. याची नुकसान भरपाईमुळे शासनाकडून नागरिकांना ३ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानीचे प्रमाण वाढत असल्याचे १ एप्रिल २०१३ ते १५ जुलै २०१६ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतल्यास दिसून येते. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे २० जणांचा मृत्यू झाला. शासनामार्फत त्यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली. जखमी २० जणांना १ लाख १२ हजार रुपयांची मदत करण्यात आली. ८५ गुरांचा बळी गेल्याने १३ लाख १४ हजार रुपयांची मदत संबंधितांना देण्यात आली. ४ हजार ८४६ घरांची अंशत: तर ५३९ घरांची पूर्णत: पडझड झाली. यात २ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये बाधितांना देण्यात आली. २०१३ मध्ये एकूण २ कोटी ९० लाख ४१ हजार रुपयांची भरपाई शासनातर्फे देण्यात आली. २०१४ मध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. यात शासनामार्फत १८ लाख रुपयांची मदत देण्यात आली. ५२ जनावरांचा बळी गेल्याने ५ लाख ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. १ हजार ५६२ घरांची अंशत: तर ७८ घरांची पूर्णत: पडझड झाली. यापोटी बाधितांना ३१ लाख ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. २०१४ या वर्षात एकूण ५४ लाख ४६ हजार रुपयांची मदत संबंधित कुटुंबीयांना देण्यात आली.
२०१५ या वर्षात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले. यात शासनामार्फत ३६ लाख रुपयांची मदत पिडीत कुटुंबीयांना देण्यात आली. पुरात वाहून गेल्याने व अन्य कारणांनी १३ गुरे दगावली. यापोटी ३ लाख २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. पावसामुळे १ हजार २५० घरांची अंशत: तर १३ घरांची पूर्णत: पडझड झाली. यासाठी भरपाई म्हणून १४ लाख ७९ हजार रुपये देण्यात आलेत. २०१५ या वर्षात एकूण ५४ लाख ४ हजार रुपयांची मदत शासनाकडून करण्यात आली.
यावर्षी १५ जुलैपर्यंत ७ जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. आतापर्यंत २७२ घरांची पडझड झाली असून यात ७ घरे पूर्णत: कोसळली. २०१६ मध्ये मृत्यू व नुकसानग्रस्त कुटुंबींयानाही मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गौरव देशमुख ल्ल वर्धा