शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

वांगी शेतकऱ्यांकडून 13 रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात 30 रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

 दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : हल्ली शेतकऱ्यांच्या  वांगी, भेंडी, चवळीसह इतरही भाजीपाल्यांचे भाव चांगलेच गडगडले आहेत. त्यामुळे लावलेला खर्च निघणे कठीण झाले आहे, शेतकऱ्यांचा भाजीपाला  कवडीमोल भावाने खरेदी केला जातो, शेतकऱ्यांना  मिळालेल्या भावाच्या दुप्पट भावाने  ग्राहकांना विकला जातो, त्यामुळे  याचा कवडीचाही फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत नाही. भाजीपाल्याच्या  ढासळलेल्या भावबाजीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी   वांगी, भेंडी, चवळी या भाजीपाला वर्गीय उभ्या पिकात जनावरे सोडलीत, तर काहींनी पिकाची निगा राखणे सोडले, पावसाळ्याचे अडीच महिने संपले असताना आपल्या जिल्ह्यांत पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही, असे असताना सुद्धा जिल्ह्यातील उत्पादित चवळी शेंगा, भेंडी, पालक, वांगी, काकडी, ढेमस आदी  भाजीपाल्याचे दर कोसळले यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीच्या कैचीत सापडला आहे.         दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यांनी वांगी, भेंडी,शेंगा आदी भाजीपाला पिकांची लागवड केली, यामुळे आवक वाढली पण,भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहे. होणाऱ्या दरवाढीने मात्र, ग्राहकांच्याही खिशाला आर्थिक झळ पोहचत असून गृहिणींचेही बजेट कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना

 यंदा तर भाजीपाला उत्पादनाचे वाटोळे झाले आहे. यावर्षी एक एकर शेतात वांग्याची लागवड केली, ऐन वांगी निघण्याच्या भरातच वांग्यांचा दर कोसळला. त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने उभ्या पिकाची निगा राखणे सोडावे लागले, कीटकनाशके फवारणीचेसुद्धा पैसे निघत नव्हता.- किशोर लुंगे, शेतकरी जामनी 

आज मी भेंडी विकायला नेली असता फक्त ८ रुपये किलोप्रमाणे विकावी लागली, केव्हा केव्हा तर  तोडणीचाही खर्च निघत नाही. बरेचदा माल मंडीत ठेऊन रित्या हाताने घरी परतावे लागते.-विजय बेलसरे, शेतकरी जामनी,

ग्राहकांना परडवेना

 भाजीपाल्याचे भाव फक्त भाजीमंडीतच कोसळतात, यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. कोसळलेल्या दराचा भाजीपाला मात्र दारावर येताच  याची दामदुप्पट होते व  नाईलाजाने तो घ्यावाच लागतो.- प्रगती भोयर,  गृहिणी, 

चवळीच्या शेंगा अन् भेंडीचे दर फारच कमी झाले म्हणते पण प्रत्यक्षात दारावर भाजीपाला घेतला तर मात्र भाजीपाला स्वस्त झाल्याचे जाणवत नाही , ४० रुपये किलोच्या खाली कोणताही भाजीपाला मिळत नाही.- आशाबाई पन्नासे,  गृहिणी,

भावात एवढा फरक का? 

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजीपाल्याचे उत्पादन अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते, यामुळे आवक वाढली पण मागणीही घटली यामुळे चवळी शेंगा, वांगी व भेंडीची पुरती वाट लागली आहे,तसेच इतरही भाजीपालावर परिणाम झाला आहे,यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली,आणि चिल्लर भाजी विक्रेते त्यांचा वाहतूक व इतर खर्चवजा करून भाजीची विक्री करतात यामुळे ग्राहकाला याचा विशेष फायदा होत नाही, - प्रमोद फटिंग, भाजीपाला व्यापारी,

 

टॅग्स :vegetableभाज्याmarket yardमार्केट यार्ड