१० एकरातील सोयाबीन पिकावर फिरविले रोटाव्हेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:23+5:30
काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. पीक वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकाची त्यांनी फवारणी केली. मात्र, त्यांच्या सोयाबीनच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. त्यांनी विविध उपाययोजना केल्या. कृषी विभागाचे मार्गर्शन घेतले. अखेर हताश होत शेतकरी सुभाष हिवरकर यांनी दहा एकर शेतात उभ्या सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरविला.

१० एकरातील सोयाबीन पिकावर फिरविले रोटाव्हेटर
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यातील आरंभा येथील शेतकऱ्याच्या १० एकर शेतात पेरलेल्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकऱ्याने संपूर्ण शेतातील पिकावर रोटाव्हेटर चालवून सोयाबीन नष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आरंभा येथील शेतकरी सुभाष हिवरकर यांचे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनचे नुकसान झाले होते. यंदा कोरोनाच्या संसर्गातही त्यांनी सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी करुन आपल्या दहा एकर शेतात सोयाबीनची लागवड केली. त्यासाठी त्याां अनेक समस्यांचा सामना करावा लागला. कर्जबाजारी होत लागवडीचा खर्च केला. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. पीक वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकाची त्यांनी फवारणी केली. मात्र, त्यांच्या सोयाबीनच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. त्यांनी विविध उपाययोजना केल्या. कृषी विभागाचे मार्गर्शन घेतले. अखेर हताश होत शेतकरी सुभाष हिवरकर यांनी दहा एकर शेतात उभ्या सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरविला. त्यामुळे शेतकरी सुभाष हिवरकर यांचे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीचे सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद भटे यांनी केली आहे.