वर्धा जिल्ह्यात चालत्या ट्रकने घेतला अचानक पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 14:49 IST2019-02-27T14:28:10+5:302019-02-27T14:49:36+5:30
येथील सत्याग्रही घाटात कांदा घेऊन जात असलेल्या एका ट्रकला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. यात ट्रकमधील कांद्याच्या ३५० गोण्या जळून खाक झाल्या.

वर्धा जिल्ह्यात चालत्या ट्रकने घेतला अचानक पेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: तळेगाव (शा.पं.) येथील सत्याग्रही घाटात कांदा घेऊन जात असलेल्या एका ट्रकला बुधवारी सकाळी १० च्या सुमारास अचानक आग लागली. यात ट्रकमधील कांद्याच्या ३५० गोण्या जळून खाक झाल्या. चाळीसगावचे रहिवासी असलेल्या नामदेव सोममिरे या शेतकऱ्याच्या ३५० कांद्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या ट्रकला सत्याग्राही घाटात अचानक आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून क्लिनर व अन्य शेतकऱ्यांना सूचना दिली. आगीच्या घटनेची माहिती तळेगाव पोलिस ठाण्याला दिल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. हे दल येईपर्यंत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीचे कारण समजू शकले नाही.