कोविड संकटात कस्तुरबा हेल्थ सोसायटीची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST2020-12-14T05:00:00+5:302020-12-14T05:00:17+5:30

वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, महात्मा गांधी इन्स्टि्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, कस्तुरबा हेल्थ सोयायटीचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

The role of Kasturba Health Society is important in the Kovid crisis | कोविड संकटात कस्तुरबा हेल्थ सोसायटीची भूमिका महत्त्वाची

कोविड संकटात कस्तुरबा हेल्थ सोसायटीची भूमिका महत्त्वाची

ठळक मुद्देअमीत देशमुख : सेवाग्रामला देणार भेट

  लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : कस्तुरबा हेल्थ सोसायटी सेवाग्राम ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे. कोविड-१९ आपत्तीतही कस्तुरबा हेल्थ सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपण स्वत: लवकरच या सोसायटीला भेट देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,  वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरुभाई मेहता, महात्मा गांधी इन्स्टि्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, कस्तुरबा हेल्थ सोयायटीचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले, कस्तुरबा हेल्थ सोसायटीने कोरोना संकटाच्या काळात मोठे काम केले आहे. मेळघाटामध्ये ५० खाटांचे रुग्णालय असून येथेही अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या ५० वर्षात ही सोसायटी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असून आपण लवकरच या सोसायटीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामाची माहिती जाणून घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र शासनामार्फत ५० टक्के, राज्य शासनामार्फत २५ टक्के आणि उर्वरित २५ टक्के खर्च संस्थेकडून केला जातो. महाराष्ट्र अजूनही कोविड-१९ परिस्थितीशी मुकाबला करीत आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The role of Kasturba Health Society is important in the Kovid crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य