शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

घरफोड्या करणारे चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:00 IST

खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआठ लाखांचे दागिने जप्त : चोरट्यांनी नऊ ठिकाणी चोरी केल्याची दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून आणखी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींनी नऊ चोरीच्या नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून सुमारे ८ लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.स्थानिक भामटीपुरा भागातील अनिल गोपालदास भैया यांच्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. तपासाचे सूत्र स्विकारताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या हालचालींना गती देत सुरूवातीला सिद्धार्थनगर येथील रहिवासी असलेल्या राकेश सकट याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवीन मुलायमसिंग धूर्वे (२०), पंकज धू्रव लोंढे (२६) व सचीन युवराज लोंढे (२०) सर्व रा. अशोकनगर यांना ताब्यात घेतले. या चारही आरोपींनी संगणमत करून बोरगांव (मेघे), भामटीपूरा, अशोकनगर, सिध्दार्थनगर, पंचवटीनगर आदी भागात एकूण नऊ घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे ७ लाख २९ हजार रुपये किंमतीचे २४३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ हजार ५०० रुपये किंमतीचे १५० ग्रॅमचे चांदीचे दागिने, पाच मोबाईल असा एकूण ७ लाख ५३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, आशीष मोरखडे, सहा. फौजदार नामदेव किटे, उदयसींग बारवाल, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमल, हरीदास काकड, परवेज खान, वैभव कट्टोजवार, अमीत शुक्ला, सचिन खैरकार, अमर लाखे, आनंद भस्मे, तुषार भूते आदींनी केली.शहरासह रामनगर पोलिसांच्या हद्दीत केले काम फत्तेस्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांनी एकूण नऊ गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यापैकी एक घटनास्थळ रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तब्बल आठ घटनास्थळ वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चोरट्यांच्या धाडसाबाबत उलट-सुलट चर्चा होत असल्याचे दिसून येते. या चारटी चोरट्यांपासून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ताब्यातील आरोपींना वर्धा शहर पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.दाखल गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाकडे एसपींचे लक्षवर्धा शहर व रामनगर पोलीस स्टेशन परीसरातील घरफोडीचे प्रमाण नजीकच्या काळात वाढल्याने दाखल गुन्ह्यांच्या प्रकटीकरणा संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली व अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी स्वत: लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.चोरीचे सोने तारणातआरोपींनी गुन्ह्यातील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची पद्धत बदविल्याचे पोलिसांच्या या कारवाईमध्ये पुढे आले आहे. सदर चोरट्यांनी चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने चक्क एका नामांकीत कंपनीत तारण योजनेत ठेवण्यात आले होते. सदर मुद्देमाल तारणात ठेवून या चोरट्यांनी मोठी रक्कम या कंपनीकडून उचलल्याचेही पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. त्यामुळे मौल्यवान साहित्य तारण ठेवणाºया कंपन्यांनीही आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस