वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:01 IST2020-02-11T15:01:31+5:302020-02-11T15:01:53+5:30

वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत दत्त मंदिर जवळील एका सराफा व्यावसायिकाचे दुकान आणि गोल बाजार परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करून तेथून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला.

Robbery in Two shops of main market in Wardha | वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली

वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: शहरातील मुख्य बाजारपेठेत दत्त मंदिर जवळील एका सराफा व्यावसायिकाचे दुकान आणि गोल बाजार परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करून तेथून रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल १.४० लाखांची रोख तर ज्वेलरीच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: Robbery in Two shops of main market in Wardha

टॅग्स :Robberyचोरी