उड्डाणपुलावरून बरबडी जाणारा मार्ग राहील बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:01 IST2019-05-22T21:00:27+5:302019-05-22T21:01:36+5:30
एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात गुरूवारी सकाळपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून बरबडीच्या दिशेने जाणारा मार्ग तात्पुरता बंद राहणार आहे. इतकेच नव्हे, तर बरबडीकडून वर्धेकडे तर वर्धेकडून बरबडीकडे ये-जा करणाऱ्यांना गांधीग्राम कॉलेजजवळून मार्गक्रमण करावे लागणार आहे.

उड्डाणपुलावरून बरबडी जाणारा मार्ग राहील बंद
वर्धा : एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात गुरूवारी सकाळपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून बरबडीच्या दिशेने जाणारा मार्ग तात्पुरता बंद राहणार आहे. इतकेच नव्हे, तर बरबडीकडून वर्धेकडे तर वर्धेकडून बरबडीकडे ये-जा करणाऱ्यांना गांधीग्राम कॉलेजजवळून मार्गक्रमण करावे लागणार आहे.
मतमोजणीदरम्यान कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कोडापे यांच्यासह त्यांचे २७ सहकारी तैनात राहणार आहेत. शिवाय याच २७ वाहतूक पोलीस कर्मचाºयांपैकी १५ जणांची विजयी मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारच्या निवडणूक बंदोबस्ताची रंगीत तालीम बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घेण्यात आली. त्याची वरिष्ठ अधिकाºयांनी पाहणीही केली.
हा आहे पर्यायी मार्ग
इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून वर्धा शहरातून सेवाग्रामच्या दिशेने आणि सेवाग्राम येथून वर्धेच्या दिशेने वाहनचालकांना ये-जा करता येणार आहे;पण बरबडीकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद राहणार आहे.
इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून बरबडीकडे जाणारा मार्ग बंद राहणार असल्याने वाहनचालकांना याच भागातील गांधीग्राम कॉलेज मार्गाने बरबडीच्या दिशेने जावे लागणार आहे. शिवाय वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत.