शेतीच्या वहिवाटीचा रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:17+5:30
वल्लभनगर येथील वयोवृद्ध शेतकरी मारोतराव सोळंके यांची रसुलाबाद येथे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीला वहिवाटीसाठी जुनाच रस्ता आहे. लागूनच रसुलाबाद येथील मंदिर देवस्थान कमिटीचे शेत आहे. या कमिटीने तुमचा येथून रस्ता नाही, हे कारण पुढे करून मारोतराव सोळंके यांच्या शेतातील रस्ता बंद केला. त्यामुळे शेतकरी सोळंके यांनी पुलगाव पोलिस ठाण्यात व आर्वी तहसील कार्यालयात चार महिन्यांपूर्वी तक्रार केली.

शेतीच्या वहिवाटीचा रस्ता केला बंद
n लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. महसूल अधिकारी ‘तारीख पे तारीख’ देऊन मनस्ताप देत असल्याने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
वल्लभनगर येथील वयोवृद्ध शेतकरी मारोतराव सोळंके यांची रसुलाबाद येथे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीला वहिवाटीसाठी जुनाच रस्ता आहे. लागूनच रसुलाबाद येथील मंदिर देवस्थान कमिटीचे शेत आहे. या कमिटीने तुमचा येथून रस्ता नाही, हे कारण पुढे करून मारोतराव सोळंके यांच्या शेतातील रस्ता बंद केला. त्यामुळे शेतकरी सोळंके यांनी पुलगाव पोलिस ठाण्यात व आर्वी तहसील कार्यालयात चार महिन्यांपूर्वी तक्रार केली. ही बाब महसूल विभागाच्या अखत्यारित असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. नंतर सोळंके यांनी परत तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. तब्बल दोन महिन्यांनी आर्वीचे नायब तहसीलदार यांनी शेताची पाहणी केली व संबंधित शेतकऱ्यांना या तारखेला उपस्थित राण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, अद्याप या वहिवाटीचा तिढा कायम असल्याने तहसीलचे अधिकारी या शेतकऱ्याला ‘तारीख पे तारीख’ देत आहे. हा शेतकरी तहसील कार्यालयात येरझारा करून थकला. मात्र, वहिवाटीचा प्रश्न सुटला नाही. शेतकऱ्याचा शेतमाल शेतातच पडून आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.