गांधी जिल्ह्यात रस्ता अपघाताने घेतले १८७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:11+5:30

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

Road accident in Gandhin district | गांधी जिल्ह्यात रस्ता अपघाताने घेतले १८७ बळी

गांधी जिल्ह्यात रस्ता अपघाताने घेतले १८७ बळी

ठळक मुद्दे१७६ गंभीर जखमी : मृतांमध्ये पुरुषांची संख्या जास्त

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात असले तरी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत गांधी जिल्ह्यात झालेल्या ४८८ रस्ते अपघातांमध्ये १८७ व्यक्ती ठार झाल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन यंदाच्या ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वाहतूक नियमांचे पालन कसे गरजेचे आहे याविषयी प्रभावी जनजागृती होण्याची गरज आहे.
दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक नियमांकडे पाठ दाखविणाऱ्या अनेकांवर वर्षभऱ्यात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु, तरुण मंडळी वाहतूक नियमांना फाटाच देत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परिणामी, तरुणांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वर्षभºयात जिल्ह्यात एकूण ४८८ रस्ते अपघात झाले असून यात १८७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७१ पुरूष तर १६ महिलांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

५७ अपघातात सुदैवाने दुखापत टळली
जिल्ह्यातील ९२ अपघातांमध्ये १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. तर ५७ अपघातांमध्ये सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. असे असले तरी वाहनांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

पोलिसी कारवाईबाबत गैरसमज कायम
अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर काही व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना मदत करतात. तर काही व्यक्ती तेथून पळ काढण्यातच धन्यता मानतात. अपघातातील जखमींना मदत केल्यास आपणही पोलिसांच्या कार्यवाहीत अडकू असा गैरसमज अजूनही कायम असल्याने तो कसा दूर करता येईल याविषयी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रभावी काम होणे गरजेचे आहे.

एकाचाही गौरव नाही
अपघात झाल्याचे लक्षात येताच अनेक नागरिक घटनास्थळी गर्दी करतात. नागरिकांच्या या गर्दीतील काहीच व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना रुग्णालयात दाखल करतात. परंतु, पोलीस विभाग असो वा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जखमीला रुग्णालयापर्यंत नेणाºया अशा एकाही व्यक्तीला आतापर्यंत गौरविण्यात आले नसल्याची शोकांतीका आहे.

Web Title: Road accident in Gandhin district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात