धार्मिक विधी चालेल; पण बैल, नंदी पोळा भरविता येणार नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:55+5:30
शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामा मदत करणाºया बैलाची कृतज्ञता पोळा या सणादरम्यान शेतकरी व्यक्त करतात. बळीराज्यासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाच मानला जातो. ऐरवी पोळा या सणादरम्यान जिल्ह्यातील विविध भागात आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा पार पडायची. परंतु, यंदाच्या वर्षी बैल आणि नंदी पोळा भरणारच नसल्याने याही उत्सवावर कोरोनाने विरजण पडले आहे.

धार्मिक विधी चालेल; पण बैल, नंदी पोळा भरविता येणार नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना संकटामुळे सण आणि उत्सवांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश निर्गमित करून धार्मिक विधी चालेल, पण बैल आणि नंदी पोळा भरविता येणार नाही, असे निर्देश दिल्याने पोळ्याच्या उत्सवावर विरजन पडले आहे.
शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामा मदत करणाऱ्या बैलाची कृतज्ञता पोळा या सणादरम्यान शेतकरी व्यक्त करतात. बळीराज्यासाठी हा सण अतिशय महत्त्वाचाच मानला जातो. ऐरवी पोळा या सणादरम्यान जिल्ह्यातील विविध भागात आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा पार पडायची. परंतु, यंदाच्या वर्षी बैल आणि नंदी पोळा भरणारच नसल्याने याही उत्सवावर कोरोनाने विरजण पडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या लाडक्या सर्जा राजाला आकर्षक सजवून पुजनासाठी मंदिरात नेता येणार आहे. परंतु, याही ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे.
बैल सजावट स्पर्धा आयोजनावर बंदी
बैल आणि नंदी पोळ्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील शहरांसह विविध गावांमध्ये बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येतात. परंतु, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे या स्पर्धांवर बंदी आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.