नोडल अधिकारी माळोदेंचे निलंबन रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:14+5:30

कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून माळोदे यांना निलंबित करण्यात आले. त्याबाबतचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. नोडल अधिकारी म्हणून काम करताना संबंधित क्वारंटाईन लोकांकडून कशाप्रकारे वागणूक मिळते आणि कितपत सहकार्य केले जाते, याची सर्वांना जाणीव आहे. मात्र, या वास्तवाकडे दुर्लक्ष करीत त्यांना निलंबित करणे योग्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने म्हटले आहे.

Revoke the suspension of Nodal Officer Malode | नोडल अधिकारी माळोदेंचे निलंबन रद्द करा

नोडल अधिकारी माळोदेंचे निलंबन रद्द करा

Next
ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक समितीची मागणी : काळी फीत लावून दर्शविला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत प्राथमिक शिक्षक कोणत्याही आरोग्यविषयक सुविधा नसताना सेवा देत आहे. असे असताना क्वारंटाईन व्यक्ती घरी राहात नाही व नंतर तो पॉझिटिव्ह निघतो, या कारणावरून नोडल अधिकारी म्हणून नियुक्त शिक्षकाला जबाबदार धरत निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी, शिक्षकांनीे या घटनेचा कर्तव्यावर काळी फीत लावून विरोध करीत त्यांचे निलंबन तत्काळ रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली. बुधवारीही हे आंदोलन सुरूच असणार आहे.
वर्धा पंचायत समिती अंतर्गत सावंगी (मेघे) प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल माळोदे हे सावंगी येथेच नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या क्षेत्रात परगावाहून एक व्यक्ती विनापरवानगी गावात आल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यानच्या काळात ही व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय गृह विलगीकरणात होते. मात्र, ते सूचनांचे पालन न करता समाजात वावरत होते.
कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून माळोदे यांना निलंबित करण्यात आले. त्याबाबतचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला.
नोडल अधिकारी म्हणून काम करताना संबंधित क्वारंटाईन लोकांकडून कशाप्रकारे वागणूक मिळते आणि कितपत सहकार्य केले जाते, याची सर्वांना जाणीव आहे. मात्र, या वास्तवाकडे दुर्लक्ष करीत त्यांना निलंबित करणे योग्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने म्हटले आहे.
बुधवारीही हे आंदोलन सुरू राहणार असून समाजातही काळी फीत लावून विरोध दर्शविणार असल्याचेही समितीचे कळविले आहे. आंदोलनात समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष रामदास खेकारे, सरचिटणीस मनीष ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिक्षकांचा समावेश आहे.

Web Title: Revoke the suspension of Nodal Officer Malode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.