संचमान्यता रखडली

By Admin | Updated: February 23, 2016 02:35 IST2016-02-23T02:35:02+5:302016-02-23T02:35:02+5:30

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शाळांच्या संचमान्यतेचे काम रखडल्याचे दिसते. नव्या संचमान्यमेमुळे बरेच

Retrieve the permissions | संचमान्यता रखडली

संचमान्यता रखडली

रूपेश खैरी ल्ल वर्धा
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शाळांच्या संचमान्यतेचे काम रखडल्याचे दिसते. नव्या संचमान्यमेमुळे बरेच शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे यांच्या समायोजनचाची समस्या निर्माण होणार आहे. केवळ शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाली नसल्याने ते आदेश शाळांना देण्यात आले नसल्याची माहिती आहे.
शिक्षण विभागाच्या माध्यमिक कार्यालयाला खाजगी माध्यमिक शाळांची २०१४-१५ व २०१६ या वर्षाची आॅनलाईन संचमान्यता करण्याचे आदेश शिक्षण मंडळ पुणेचे विभागीय अध्यक्ष डॉ. सुनील मगर यांनी ६ फेब्रुवारी रोजी दिले. आदेशात २०१४-१५ ची संचमान्यता शाळांनी अंतिम करून २०१५-१६ ची आॅनलाईन संचमान्यता शासन निर्णय २८ आॅगस्ट १५ व ८ जाने. २०१६ प्रमाणे उपलब्ध करून दिली असल्याचे नमूद आहे. असे असताना फेब्रुवारी संपणार असतानाही शाळांना त्यांची माहिती देण्यात आली नाही. प्राप्त माहितीनुसार, २०१४-१५ ची संचमान्यतेच्या प्रती काढण्यात आल्या असून त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी व्हायची असल्याचे सांगितले. यामागचे कारण विचारले असता, ‘अपुरा कर्मचारी वर्ग, एका अधिकाऱ्याकडे दोन विभागाचा चार्ज’ असे सांगण्यात आले. या कारणांमुळे शाळांपर्यंत अद्यापही संचमान्यता प्रती मिळाल्या नाहीत. जोपर्यंत १४-१५ ची संचमान्यता मिळत नाही तो पर्यंत १५-१६ च्या संचमान्यतेबाबत संभ्रम कायम राहणार आहे. २०१४-१५ च्या संचमान्यतेबाबतचा आढावा घेतला असता बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. एका मोठ्या संस्थेतील शाळांमध्ये ४० ते ५० पदे कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाही न करता त्यांना मूळ आस्थापनेवरील शाळेवर ठेवून वेतन देण्याचे आदेश आहेत. याचा थेट परिणाम २०१५-१६ च्या संचमान्यतेत पडतील.

नव्या संचमान्यतेतून विशेष शिक्षक गायब!
४वर्धा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या माध्यमिक शाळांच्या २०१५-१६ च्या आॅनलाईन संचमान्यतेमध्ये यापूर्वी मान्य असलेली विशेष शिक्षकाची (कला, कार्यानुभव, संगित व शारीरिक ) पदे यातून गायब करण्यात आली आहे. अशा शिक्षकांची गणना इत्यादी सहा ते आठच्या पदविधर शिक्षकांमध्ये करण्यात येणार आहे. ज्या शाळांची पदे कमी झाली असल्यास अशी पदे अतिरिक्त समजण्यात येवून त्यांचे समायोजन २८ आॅगस्टच्या शासन निर्णयातील नियम ३ नुसार होणार आहे.
अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाकडे आस
४संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होणार असल्याने ते शिक्षक समायोजनासाठी सुरक्षित शाळेच्या शोधात असून शाळा मिळण्याकरिता आस लावून बसले आहेत. शासनाने नुकतीच पदभरतीवरील बंदी उठविली असल्यामुळे अनेक शाळांमध्ये रिक्त जागा काही समायोजनाने तरी काही पदे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांकडून भरली जाणार असल्याने संस्थाचालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
संचमान्यतेबाबत शिक्षक संघटनांची चुप्पी !
४सतत दोन वर्षांच्या संचमान्यतेचे शाळांना अद्यापही शिक्षण विभागाकडून वाटप न झाल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाबाबतची विचारणा जिल्ह्यात कार्यरत माध्यमिक शिक्षकांची कोणतीही संघटना करीत नसल्याचे चित्र आहे. संघटनांचे नेते अधिवेशनासाठी निधी गोळा करणे, काही नेते शिक्षक नेते येत्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तर काही केवळ, आपल्याच सत्कारात व्यस्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा ‘वाली’ कोण असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग वाऱ्यावर
४जि. प.च्या शिक्षण विभागातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचे पद मागील काही महिन्यांपासून रिक्त आहे. उपशिक्षणाधिकाऱ्याकडे दोन्ही विभागाचा प्रभार आहे. सात गटशिक्षणाधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. सभापतीही कारागृहात असल्यामुळे हा विभाग रामभरोसे झाला आहे.

संचमान्यतेचे आदेश आॅनलाइन आले आहेत. त्याच्या प्रती तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर स्वाक्षरी करणे बाकी असल्याने त्या शाळांना पाठविण्यात आल्या नाहीत. स्वाक्षरी होताच त्याची माहिती शाळांना देण्यात येईल.
- धनराज तेलंग, शिक्षणाधिकारी, जि.प. वर्धा.

Web Title: Retrieve the permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.