साहित्यिकांवर देश व समाज वाचविण्याची जबाबदारी
By Admin | Updated: January 2, 2016 08:35 IST2016-01-02T08:35:48+5:302016-01-02T08:35:48+5:30
पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ

साहित्यिकांवर देश व समाज वाचविण्याची जबाबदारी
वर्धा : पराक्रमी राजांचा इतिहास आपण अनेकदा वाचला आहे. पण या इतिहासात सामान्य माणसं कुठेही आढळत नाहीत. केवळ एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्यात त्याची प्रजा सुखी होती, असेच उल्लेख वारंवार येतात. साहित्यामध्ये सामान्यांचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. तसेच देश आणि समाज एकसंघ ठेवण्याची जबाबदारी साहित्यिकांनी घेणे आवश्यक आहे, मत व्यास पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मद्गल यांनी व्यक्त केले.
राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या वतीने ‘साहित्यकार का दायित्व’ या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, कोषाध्यक्ष नवरतन नाहर, डॉ. हेमचंद वैद्य, यशोधरा मिश्र, छाया पाटील, डॉ. सूर्यभान रनसुभे आदींची उपस्थिती होती. यावेळी अरूणा देशमुख, कुसूम त्रिपाठी, अर्जून गायगोल, अशोक शुक्ला, नरेंद्र दंडारे, जयश्री पतकी, वामन कामडी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
मुद्गल म्हणाल्या, आज आपण परिवर्तनाच्या काळातून जात आहो. हा काळ कौटुंबिक समाज उद्ध्वस्त करणारा आहे. हीच परिस्थिती राहिल्यास देशाचे अंतर्गत तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देशाला एकसंघ बनविण्यासाठी लेखकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यानंतर ‘मिलीये रचनाकार से’ या कार्यक्रमात डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी चित्रा मुदगल यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सामाजिक प्रश्न आणि लेखकाची जबाबदारी यावर चर्चा झाली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैद्य यांनी केले. आभार नरेंद्र दंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. एस. कुमार काशिनाथ गावंडे, सुनिती बेंदुर, संजीवनी शुक्ला, वर्षा पुनवटकर, प्रा. शेख हाशम, प्राचार्य अशोक मेहरे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)